सैफ-करीनाच्या बाळाचं नाव काय असेल?; रणधीर कपूर म्हणतात…

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान यांना दुसऱ्यांदा मुलगा झाला आहे.

सैफ-करीनाच्या बाळाचं नाव काय असेल?; रणधीर कपूर म्हणतात...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान यांना दुसऱ्यांदा मुलगा झाला आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये लॉकडाऊन दरम्यान करीनाने आई होणार असल्याची बातमी दिली होती. 2016 मध्ये करीना पहिल्यांदा आई झाली होती. सैफ आणि करीनाने पहिल्या बाळाचं नाव तैमूर ठेवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. (Randhir Kapoor’s comment on what will be the name of Kareena Kapoor’s second child)

या नावावरुन करीना आणि सैफ चांगलेच ट्रोलही झाले होते. आता सोशल मीडियावर एक चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे तैमूरच्या भावाचे नाव काय…सोशल मीडियावर अनेकांनी बाळाचं नाव सुचवत करीना-सैफवर निशाणा साधलाय.  मात्र, आता यासर्वांमध्ये करीनाचे वडिल रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांनी बाळाचे काय नाव ठेवणार यावर मोठं भाष्य केलं आहे.

रणधीर कपूर यांना ज्यावेळी विचारण्यात आले की, करीनाच्या मुलाचे नाव काय असणार त्यावेळी रणधीर कपूर म्हणाले की, सध्या आम्ही खूप आनंदी असून आमचा आनंद सातो आसमानला पोहचला आहे. कारण मी दुसऱ्यांदा आजोबा झालो आहे. मी करीना आणि बाळाची भेट दवाखान्यात जाऊन घेतली आहे. दोघांचीही तब्येत चांगली आहे. आम्ही अजून बाळाच्या नावाबद्दल काही विचार केला नाही.

काहींनी तर ‘मुबारक हो औरंगजेब आया है’ असं म्हंटलं आहे. तैमूरचा छोटा भाऊ औरंगजेब आला अशा कमेंट करत निशाणा साधलाय. तर काहींनी महमंद घोरी, अहमद शहा अब्दाली आणि खिलजी अशी नावं सूचवत सैफ आणि करीनाला पुन्हा ट्रोल केलंय.  2016मध्ये जेव्हा करीना पहिल्यांदा गर्भवती होती, तेव्हा तिने त्या कालावधीत काम करण्याचा खूप आनंद घेतला होता.दरम्यानच्या काळात तिने अनेक जाहिरातींचे चित्रीकरण केले होते. बेबी बंपसह करीनाने रॅम्प वॉक केला होता. त्यावेळी तिचा हा रॅम्प वॉक अतिशय प्रसिद्ध झाला होता.

संबंधित बातम्या : 

करीनाच्या दुसऱ्या बाळाचं नाव काय? सोशल मीडियावर खमंग चर्चा!

कंगना रनौतच्या ‘धाकड’ चित्रपटाचे भोपाळमधील शूटिंग पूर्ण!

Video : बोल्ड आणि टोल्ड नेहा पेंडसे, खास व्हिडीओ शेअर करत नवऱ्याला गिफ्ट!

(Randhir Kapoor’s comment on what will be the name of Kareena Kapoor’s second child)

Published On - 1:21 pm, Mon, 22 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI