AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranveer Singh : इंडस्ट्रीतील बंदीनंतर पहिल्यांदाच दिसला रणवीर सिंह; काळा गॉगल, काळा, मास्क.. चेहरा झाकून बाहेर पडला ‘धुरंधर’ स्टार

Ranveer Singh News : डॉन-3 मुळे फरहान अख्तर आणि अभिनेता रणवीर सिंह याच्यावर चर्चेत असून आता FWICE ने रणवीरवर बंदी घातली आहे. या संपूर्ण वादादरम्यान रणवीरने मौन बाळगलं, मात्र याच वादादरम्यान नुकतीच त्याची पहिली झलक दिसली. मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झालेल्या रणवीरचा लुक पाहून सगळेच अवाक् झाले.

Ranveer Singh : इंडस्ट्रीतील बंदीनंतर पहिल्यांदाच दिसला रणवीर सिंह; काळा गॉगल, काळा, मास्क.. चेहरा झाकून बाहेर पडला 'धुरंधर' स्टार
डॉन 3 च्या वादादरम्यान पहिल्यांदाच दिसला रणवीर सिंह
| Updated on: May 26, 2026 | 11:21 AM
Share

Ranveer Singh First Public Appearance : ‘धुरंधर’ चित्रपटाच्या दोनही भागांना मिळालेल्या अभूतकपूर्व यशामुळे अभिनेता रणवीर सिंह हा चांगलाच चर्चेत होता. त्याच्या कामाचे कौतुक तर झालेच, पण चित्रपटाने बॉक्स ऑफीसवरही बक्कळ कमाई केल्याने रणवीरचा भाव बराच वधारला. त्याची लोकप्रियताही प्रचंड वाढली. मात्र आता हाच रणवीर पुन्हा चर्चेत आला तो फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटामुळे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने (FWICE) रणवीर सिंगविरोधात एक मोठं पाऊल उचललं आहे. FWICE ने त्याच्याविरोधात असहकाराचा अर्थात नॉन-कोऑपरेशनचा आदेश जारी केला आहे. त्याच्यावर बंदी घालण्यात आली असून हा वाद मिटेपर्यंत कोणीही त्याच्यासोबत काम करणार नाही.

मात्र या वादादरम्यान, रणवीर हा आता पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या दिसला आहे. कालच रणवीर सिंह हा मुंबई विमानतळावर दिसला, मात्र त्याच्याभोवती सुरक्षा व्यवस्था होती. या अभिनेत्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचा लूक पाहून तर अनेकांना धक्का बसलाय.

अभिनेता रणवीर सिंहवर बंदी घालण्यात आली आहे आणि त्याच्यासोबत यापुढे काम न करण्याचे आदेश एफडब्ल्यूआयसीईने (FWICE) चित्रपटसृष्टीला दिले आहेत. फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ मधून रमवीरने अचानक माघार घेतल्यामुळे अभिनेत्याविरोधात हा निर्णय घेण्यात आला. या सर्व वादादरम्यान काहीही न बोलणारा, मौन बाळगणारा रणवीर काल पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या स्पॉट झाला. त्याचा अंदाचही बराच बदलल्याचं दिसून आलं.

काळा मास्क, काळा गॉगल…

‘धुरंधर’पासून रणवीर सिंग चर्चेत असून आणि ‘डॉन 3’ मुळे त्याच्याबद्दलची चर्चा आणखीनच वाढली. या वादाच्या पार्श्वभूमीवर रणवीर सिंह काल एअरपोर्टवर दिसला, मात्र त्याच्याभोवती सुरक्षारक्षकांचं कडंही दिसून आलं. साधा पांढरा कुर्ता पायजमा आणि नेहरू जॅकेट घातलेला रणवीर साध्या अंदाजात दिसला. मात्र त्यासोबत काळा गॉगल, आणि काळा मास्क लावल्याने त्याचा चेहरा पूर्णपणे दिसत नव्हता. गाडीतून उतरल्यावर तो थेट चालायला लागला, तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींशी ना तो काही बोलला ना फोटोसाठी पोझ दिली. वादाच्या दरम्यान पहिल्यांदाच स्पॉट झालेल्य रणवीरच्या चेहऱ्यावर हास्य किंवा नेहमीचा खेळकरपणा नव्हता. तो आपल्या गाडीतून उतरून शांतपणे आत निघून गेला.

डॉन 3 चा वाद काय ?

दिग्दर्शक फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार होता. चित्रपटाची घोषणाही झाली होती, पण नंतर रणवीरने यातून माघार घेतली. फरहान अख्तरच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनचं काम आधीच सुरू झालं होतं आणि त्यावर अंदाजे 45 कोटी रुपये खर्चही झाला होता. पण रणवीरने चित्रपटातून अचानक माघार घेतल्यामुळे निर्मात्यांचं मोठं नुकसान झालं आहे. फरहानने फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन (IFTDA) कडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पुढील कारवाईसाठी हे प्रकरण FWICE कडे पाठवण्यात आले. आता, FWICE ने रणवीरविरुद्ध नॉन-कोऑपरेशन नोटीस बजावत त्याच्यावर बंदी घातली आहे.

Follow Us
विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत धुसफूस; दिल्ली-पासून मुंबईपर्यंत...
विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत धुसफूस; दिल्ली-पासून मुंबईपर्यंत....
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट! CBI च्या झडतीत धक्कादायक खुलासा
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट! CBI च्या झडतीत धक्कादायक खुलासा.
तू मागच्या जन्मी नागिण होतीस! म्हणत अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढलं? अन्
तू मागच्या जन्मी नागिण होतीस! म्हणत अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढलं? अन्.
12 दिवसांत चौथ्यांदा CNG महागलं! इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडंच
12 दिवसांत चौथ्यांदा CNG महागलं! इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडंच.
शिंदे नाराज? दिल्लीत शिंदे-शाहांची गुप्त भेट.... भेटीमागचं कारण काय?
शिंदे नाराज? दिल्लीत शिंदे-शाहांची गुप्त भेट.... भेटीमागचं कारण काय?.
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे.
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा.
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत 
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत .
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर......
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न...
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न....