Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘छावा’ची बॉक्स ऑफिसवर दहशत, पहिल्याच दिवशी इतक्या कोटींची कमाई, आकडा थक्क करणारा

Chhaava Box Office Collection Day 1: पहिल्याच दिवशी विकी कौशलने छत्रपती संभाजी राजे यांच्या भूमिकेत चाहत्यांच्या मनावर केलं राज्य, पहिल्याच दिवशी सिनेमाची बक्कळ कमाई, आकडा जाणून व्हल अवाक्

'छावा'ची बॉक्स ऑफिसवर दहशत, पहिल्याच दिवशी इतक्या कोटींची कमाई, आकडा थक्क करणारा
Follow us
| Updated on: Feb 15, 2025 | 9:08 AM

Chhaava Box Office Collection Day 1: अभिनेता विकी कौशल स्टारर ऐतिहासिक ‘छावा’ सिनेमा 2025 वर्षातील बहुप्रतीक्षीत सिनेमा आहे. 14 फेब्रुवारी रोजी सिनेमा अखेर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि चित्रपटगृहात प्रेक्षकांना तुफान गर्दी केली. सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगने देखील सर्व रेकॉर्ड मोडले. सिनेमाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये दिसून येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘छावा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. ‘छावा’ सिनेमाचं कौतुक फक्त विश्लेषकच नाही तर, नेटकरी देखील सोशल मीडियावर करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर सिनेमाचं कौतुक होत आहे. सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूत्र छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी विकीने प्रचंड मेहनत घेतली आहे.

एवढंच नाही तर, पहिल्याच दिवशी सिनेमाने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. ‘छावा’ सिनेमाने 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत. Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘छावा’ ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 31 कोटींची कमाई केली आहे. हे प्राथमिक आकडे असले तरी अधिकृत डेटा आल्यानंतर त्यात थोडे बदल होऊ शकतात.

‘छावा’ ने 2025 साली प्रदर्शित झालेल्या सर्व दक्षिण ते बॉलीवूड सिनेमांच्या ओपनिंग डे कलेक्शनचा विक्रम मोडला आहे आणि वर्षातील सर्वात मोठा ओपनर सिनेमा बनला आहे. या वर्षी दक्षिण आणि बॉलीवूडसह आठ सिनेमे थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. त्या सर्व सिनेमांच्या पहिल्या दिवसांच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर..

‘छावा’ सिनेमाने प्रदर्शनानंतर पहिल्या दिवशी 31 कोटी रुपयांची कमाई केली. ‘विदामुयार्ची’ सिनेमाने पहिल्या दिवशी 26 कोटींची कमाई केली. ‘स्काय फोर्स’ सिनेमाने पहिल्या दिवशी 15.30 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. पण आता सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘छावा’ सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर, बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाची दहशत पाहायला मिळत आहे.

‘छावा’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमात विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबत आशुतोष राणा आणि डायना पेंटी यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये सिनेमा बनवण्यात आला आहे. आता येत्या दिवसांमध्ये सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करेल पाहणं महत्त्लाचं ठरणार आहे. शनिवार आणि रविवार असल्याचा फायदा सिनेमाला होणार आहे.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.