Ratris Khel Chale 3 | ‘शेवंता परत कधी येणार?’ तुम्हालाही जाणून घ्यायचंय उत्तर? मग, लगेचच फोनचा ब्राईटनेस वाढवा!

शेवंता कधी येणार? या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल, तर लगेचच आपल्या फोनचा ब्राईटनेस वाढवा आणि शेवंताच्या या फोटोकडे नीट निरखून बघा...

Ratris Khel Chale 3 | ‘शेवंता परत कधी येणार?’ तुम्हालाही जाणून घ्यायचंय उत्तर? मग, लगेचच फोनचा ब्राईटनेस वाढवा!
शेवंता

मुंबई : ‘कोकणातली भूता लई वाईट, एकदा का झाड धरल्यानी की सोडनात नाय…’, ही टॅगलाईन तुमच्या आठवणीत असेलच! अगदी बरोबर! सगळ्यांची आवडती मालिका अर्थात ‘रात्रीस खेळ चाले’चे (Ratris Khel Chale) तिसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पहिल्या दोन पर्वांप्रमाणेच या तिसऱ्या पर्वतही तितके गूढ वातावरण प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. दरम्यान, सगळीकडे ‘अण्णा नाईक परत येणार…’, ही चर्चा सुरु आहे. या सगळ्यात ‘शेवंता’ (Shevanta) पुन्हा दिसणार का?, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तुम्हालाही हा प्रश्न पडलाय का? मग काळजी करू नका, कारण आता तुम्हाला याचे उत्तर मिळणार आहे (Ratris Khel Chale 3 When will Shevanta come back Want to know the answer Then increase the brightness of the phone).

शेवंता कधी येणार? या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल, तर लगेचच आपल्या फोनचा ब्राईटनेस वाढवा आणि शेवंताच्या या फोटोकडे नीट निरखून बघा…

‘याच’ फोटोला निरखून बघा!

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

काय म्हणता दिसलं का?? कळलं का शेवंता कधी येते? असो, तुम्ही खरंच तुमच्या फोनचा ब्राईटनेस वाढवून या फोटोकडे पाहिलं असाल, तर खरंच तुम्ही ‘शेवंता’चे चाहते आहात आणि आज तुमचा ‘एप्रिल फूल’ झालेला आहे (Ratris Khel Chale 3 When will Shevanta come back Want to know the answer Then increase the brightness of the phone).

शेवंता येणार!

वरच्या पोस्टमध्ये जरी तुमचा हिरमोड झाला असेल, तरी शेवंता येणार हे मात्र नक्की! मालिका विश्वात पुन्हा एकदा ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या तिसऱ्या पर्वाचे आगमन झाले आहे. याच निमित्ताने मालिकेतील ‘अण्णा’, ‘शेवंता’ आणि ‘माई’ ही मुख्य पात्र पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. यातही ‘शेवंता’ साकारात घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या अधिक चर्चेत आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील थरार, रहस्य या सगळ्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यानंतर या मालिकेचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

त्यातही अण्णा नाईकांचा दराराही चांगलाच चर्चेत राहिला. त्यानंतर सगळ्यांचं लक्ष वेधलं ते शेवंताने. शेवंता हे पात्र या मालिकेत आलं आणि त्यानंतर अण्णा नाईक आणि शेवंता यांच्या जोडीची चर्चा झाली. आता तिसऱ्या भागातही अण्णांसोबतच शेवंताही पुन्हा भेटीला येत आहे. शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने नुकतच ती परत येणार असल्याची गुड न्यूज तिच्या चाहत्यांना दिली आहे.

‘लवकरच भेटू…’ पहा अपूर्वाची पोस्ट

 (Ratris Khel Chale 3 When will Shevanta come back Want to know the answer Then increase the brightness of the phone)

हेही वाचा :

कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या या अभिनेत्याचं अभिनंदन, राज ठाकरेंचं रजनीकांत यांच्यासाठी खास ट्विट

Birthday Wishes | ‘तू माझं जग आहेस…’, पडद्यावरच्या ‘गुरुनाथ’ची खऱ्या आयुष्यातल्या ‘राधिका’साठी खास पोस्ट!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI