‘या’ चित्रपटाची कहाणी ऐकून 17 कलाकार आणि 21 निर्मात्यांनी दिला नकार, प्रदर्शित होताच ठरला सुपरहिट
जर तुम्हाला सीरियल किलिंग आणि सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट पाहण्याची आवड असेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका दमदार चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याला सुरुवातीला 17 कलाकार आणि 21 निर्मात्यांनी नाकार दिला पण प्रदर्शित होताच प्रचंड यशस्वी ठरला.

South Movie : बॉलिवूडमध्ये काही प्रेक्षक कॉमेडी चित्रपटाचे चाहते असतात तर काही प्रेक्षक हे हॉरर आणि सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटाचे. पण असा एक चित्रपट ज्याला 17 कलाकारांनी करण्यास नकार दिला. पण जेव्हा तो प्रदर्शित झाला तेव्हा तो प्रचंड यशस्वी ठरला. 2018 साली प्रदर्शित झालेला तमिळ चित्रपट ‘रत्सासन’ हा सुरुवातीला अत्यंत धोकादायक मानला जात होता. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाची कथा ऐकून तब्बल 17 अभिनेत्यांनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. एवढेच नाही तर 21 निर्मात्यांनी देखील या प्रोजेक्टमधून माघार घेतली होती. त्यांना हा विषय व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरेल असे वाटत होते.
मात्र, शेवटी एक्सिस फिल्म फॅक्टरीचे मालक दिल्ली बाबू पुढे आले आणि त्यांनी या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पुढे जाऊन अतिशय यशस्वी ठरला.
चित्रपटाची टीम आणि कथा
‘रत्सासन’ चित्रपटाचे दिग्दर्शन राम कुमार यांनी केलं होतं. या चित्रपटात विष्णु विशाल आणि अमला पॉल मुख्य भूमिकेत दिसले होते. याशिवाय काली वेंकट, अभिरामी, राधा रवि, सुजैन जॉर्ज आणि विनोदिनी वैद्यनाथन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.
विष्णु विशाल यांनी एका अशा पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे, ज्याला चित्रपट दिग्दर्शक बनायचे स्वप्न असते. मात्र, वडिलांच्या निधनानंतर तो पोलीस दलात दाखल होतो. तो सतत स्वतः लिहिलेल्या कथा इतरांना सांगत असतो. दरम्यान, एका रहस्यमय सिरीयल किलरमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण होते आणि इथूनच कथेला वेगळे वळण मिळते.
बजेट आणि कमाई
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘रत्सासन’ चित्रपटाचे बजेट अंदाजे 7 ते 15 कोटी रुपये होते. मात्र, प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने जवळपास 20 कोटी रुपयांची कमाई केली आणि तो सुपरहिट ठरला. ‘रत्सासन’ हा चित्रपट सध्या जिओ हॉटस्टारवर उपलब्ध आहे. मूळ तमिळ भाषेसोबतच हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू भाषांमध्येही पाहता येतो.
दरम्यान, सुरुवातीला नाकारला गेलेला ‘रत्सासन’ हा चित्रपट आज सायकोलॉजिकल थ्रिलर प्रकारातील एक कल्ट क्लासिक मानला जातो. दमदार कथा, अभिनय आणि थरारक शेवट यामुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो.
