AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मद्यधुंद अवस्थेत वृद्धेला मारहाण केल्याचा आरोप; व्हायरल व्हिडीओवर अखेर रवीना टंडनने सोडलं मौन

अभिनेत्री रवीना टंडन एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली आहे. एका वृद्ध महिलेला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा तिच्यावर आरोप आहे. यावर आता खुद्द रवीनाने मौन सोडलं आहे.

मद्यधुंद अवस्थेत वृद्धेला मारहाण केल्याचा आरोप; व्हायरल व्हिडीओवर अखेर रवीना टंडनने सोडलं मौन
Raveena TandonImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 06, 2025 | 3:30 PM
Share

अभिनेत्री रवीना टंडनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रवीनावर एका वृद्ध महिलेला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला जातोय. वांद्रे इथं रवीनाचा भररस्त्यात वाद झाल्याचा हा व्हिडीओ आहे. कार उभी करण्यावरून झालेल्या वादातून रवीना आणि तिच्या चालकाने मारहाण केल्याचा आरोप तिघांनी केला आहे. तर दुसरीकडे या घटनेत कोणालाही मारहाण झाली नसल्याचं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. पण या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. याप्रकरणी अखेर रवीनाने मौन सोडलं असून इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून तिने प्रतिक्रिया दिली आहे.

रवीनाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही बातम्यांचे पोस्ट शेअर केले आहेत. ‘रवीना आणि तिच्या ड्राइव्हरवर खोटे आरोप’, ‘कोणालाच कारची धडक लागली नव्हती, कोणीच जखमी झालं नव्हतं’, ‘रवीना मद्यधुंद अवस्थेत नव्हती, ड्राइव्हरची मदत करण्यासाठी ती घरातून आली होती’, ‘धक्क्यातून सावरत रवीनाने तिच्या कार ड्राइव्हरला कसं वाचवलं?’, ‘माझ्या ड्राइव्हरला हात लावू नका, मी विनंती करते, त्याला मारू नका’, ‘रवीना टंडनवर जमावाचा हल्ला’, अशा आशयाच्या सर्व बातम्या रवीनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केल्या आहेत.

खार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्हीत असं दिसून आलं की संबंधित वृद्ध महिला ही रवीनाच्या कारजवळच उभी होती, मात्र त्यांना कारची धडक लागली नव्हती. या घटनेनंतर तिथल्या स्थानिकांनी रवीनासह चालकाने तिघांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप केला. शनिवारी रात्री वांद्रे इथल्या कार्टर रोडवर ही घटना घडली. याप्रकरणी कोणताच एफआयआर दाखल झाला नाही. स्थानिकांनी रवीनाच्या कारला घेरल्यानंतर तिने बाहेर येऊन जमावाशी बोलण्याचा प्रयत्न केला. “कृपया मला मारू नका, माझ्या ड्राइव्हरला मारू नका”, असं ती व्हिडीओत बोलताना दिसतेय. या घटनेच्या काही तासांनी रवीना तिथून निघून गेली. रवीनाचा पती आणि प्रसिद्ध ड्रिस्ट्रीब्युटर अनिल थडानी नंतर पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांशी बोलून प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.