AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Karur Rally Stampede: मोठी बातमी! विजयच्या रॅलीत का झाली चेंगराचेंगरी? खरं कारण वाचून बसेल धक्का

Vijay Karur Rally Stampede: तमिळनाडूच्या करूर येथे सुपरस्टार विजय यांच्या निवडणूक रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 39 लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये 17 महिला, 13 पुरुष, 4 मुले आणि 5 मुलींचा समावेश आहे. पोलिसांनी TVK च्या दोन मोठ्या नेत्यांवर, एन. आनंद आणि सीटी निरमल कुमार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आता या चेंगराचेंगरीमागचे खरे कारण समोर आले आहे...

Vijay Karur Rally Stampede: मोठी बातमी! विजयच्या रॅलीत का झाली चेंगराचेंगरी? खरं कारण वाचून बसेल धक्का
VIjayImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 28, 2025 | 5:19 PM
Share

तमिळनाडूच्या करूर येथे शनिवारी रात्री अभिनेता ते नेते बनलेले विजय यांची रॅली उत्साहातून शोकात रुपांतरीत झाली. आपल्या आवडत्या सुपरस्टारला जवळून पाहण्याच्या उत्साहात लोकांमध्ये अशी चढाओढ झाली की गर्दी अनियंत्रित झाली. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 39 जणांचा बळी गेला. या मृतांमध्ये 17 महिला, 13 पुरुष, 4 मुले आणि 5 मुलींचा समावेश आहे. या अपघातात 60 हून अधिक लोक जखमी झाले असून अनेक रुग्णालयात जीवनासाठी झुंज देत आहेत. आता चेंगराचेंगरीचे खरे कारण समोर आले आहे.

नेमकं कारण काय?

अभिनेता विजय यांच्या या महारॅलीत गर्दी इतकी प्रचंड होती की काही लोक विजय यांची एक झलक पाहण्यासाठी झाडाच्या फांद्यांवर चढले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, त्यापैकी काही लोक झाडाच्या फांदीवरून खाली पडले आणि विजय यांच्या प्रचार व्हॅनच्या मागे उभ्या असलेल्या लोकांवर कोसळले. तिथूनच अचानक गोंधळ सुरु झाला. गर्दीत काहीतरी मोठा अपघात झाल्याची भीती पसरली आणि लोक इकडे-तिकडे पळू लागले. काही क्षणातच तिथे चेंगराचेंगरी झाली. स्वत:चा जीव मूठीत घेऊन पळताना काही लोक जमिनीवर पडले.

वाचा: 19-20 वर्षाच्या मुलींना माझा व्हिडीओ… प्राजक्ता माळीने सांगितला धक्कादायक अनुभव

‘तासन्तास ऊनात विजय यांची वाट पाहत होते लोक’

तमिळनाडूचे डीजीपी जी. वेंकटरामन यांनी मध्यरात्री पत्रकार परिषदेत सांगितले की, रॅलीसाठी दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी होती, पण विजय यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर दुपारी 12 वाजता येण्याची घोषणा झाली होती. यामुळे लोक सकाळी 11 वाजल्यापासूनच रॅली स्थळावर जमू लागले होते. मात्र, विजय सायंकाळी 7:40 वाजता पोहोचले. डीजीपी म्हणाले, ‘लोक तासन्तास ऊनात अन्न-पाण्याशिवाय वाट पाहत होते. यामुळे गर्दी अस्वस्थ झाली. आमचा कोणाला दोष देण्याचा हेतू नाही, पण बराचवेळ प्रतीक्षा आणि गर्दीच्या संख्येमुळे परिस्थिती बिघडली.’ पोलिसांच्या मते, आयोजकांनी 10,000 लोकांची परवानगी घेतली होती, पण सुमारे 27,000 लोक जमले. वाढत्या गर्दीसमोर परिस्थिती नियंत्रणात राहिली नाही.

उत्साह शोकात बदलला?

सुपरस्टार विजय यांची झलक पाहण्याचे स्वप्न पाहणारे हजारो लोक कधीच विचार करू शकले नसते की ही रॅली इतक्या वेदनादायक शोकांतिकेत बदलेल. झाडाच्या फांदीवरून पडलेली एक व्यक्ती त्या मृत्यूच्या लाटेची सुरुवात ठरली, ज्याने 39 निरपराध जीव घेतले. पोलिसांनी या प्रकरणी विजय यांच्या तमिळगा वेट्ट्री कझगम (TVK) विरोधात कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी TVK च्या दोन वरिष्ठ नेत्यांवर, एन. आनंद आणि सीटी निरमल कुमार यांच्यावर गैरहत्येचा गुन्हा दाखल केला आहे. कुमार हे TVK च्या करूर जिल्हा युनिटचे सचिव आहेत. या रॅलीच्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्याच हातात होती.

तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.