रेखा – संजय दत्त यांनी गुपचूप उकरलं होतं लग्न? संजूबाबाच्या वडिलांमुळे संपलं नातं

Sanjay Dutt & Rekha Affair: संजय दत्त आणि रेखा यांच्या लग्नाच्या चर्चा, रेखा यांच्या घरी पोहोचले संजूबाबाचे वडील, त्यानंतर जे घडलं ते..., काही दिवसांनंतर रेखा यांनी पत्रकार परिषद घेतली आणि.., आजही रेखा खासगी आयुष्यामुळे असतात चर्चेत...

रेखा - संजय दत्त यांनी गुपचूप उकरलं होतं लग्न? संजूबाबाच्या वडिलांमुळे संपलं नातं
Follow us
| Updated on: Aug 12, 2024 | 3:47 PM

Bollywood Kissa Sanjay Dutt & Rekha Affair: बॉलिवूडची एव्हर ग्रीन अभिनेत्री रेखा यांचं सौंदर्य वयाच्या 69 व्या वर्षी देखील कमी झालेलं नाही. आजही रेखा यांच्या सौंदर्याची चर्चा सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये रंगत असतात. आजच्या बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींचा ग्लॅमर रेखा यांच्या सौंदर्यापुढे फिका आहे. एका काळ होता जेव्हा बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर रेखा यांचं राज्य होतं. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत रेखा यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. प्रोफेशनल आयुष्यात रेखा यशाच्या शिखरावर चढल्या पण खासगी आयुष्यात मात्र त्यांनी अनेक संकटांचा सामना केला.

बॉलिवूडमध्ये सक्रिय असताना रेखा याच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री झाली नाही… असं काहीही नाही. अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत रेखा यांच्या नावाची चर्चा रंगली. पण सेलिब्रिटींसोबत रेखा यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर त्यांनी एका उद्योजकासोबत लग्न केलं. पण लग्नाच्या काही महिन्यांनंतर रेखा यांच्या पतीने स्वतःला संपवलं.. अशा प्रकारे रेखा यांच्या आयुष्यात प्रेम फार काळ राहिलं नाही…

दरम्यान, रेखा यांच्या नावाची चर्चा अभिनेता संजय दत्त याच्यासोबत रंगू लागली. रेखा, संजूबाबाच्या नावाचं सिंदूर लावते… अशा देखील चर्चा रंगल्या. पण संजूबाबा याच्या वडिलांमुळे दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही… असं देखील अनेकदा समोर आलं… संजय दत्त आणि रेखा यांच्या नात्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

संजय दत्त आणि रेखा यांनी लव्हस्टोरी

सांगायचं झालं तर, एक काळ असाही होता, जेव्हा संजूबाबाच्या आयुष्यात अनेक अडचणी होत्या. जेव्हा रेखा मात्र बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्री होत्या. 1984 मध्ये रेखा आणि संजूबाबा एका सिनेमात एकत्र काम करत होते आणि सिनेमाचं नाव होतं ‘जमीन आसमान’… हा असा काळ होता जेव्हा संजूबाबाचं करियर धोक्यात होतं. अशात रेखा यांनी संजय याच्या ड्रग्सबद्दल देखील माहिती झालं होतं.

संजूबाबाबद्दल सर्वकाही माहिती असल्यामुळे रेखा यांनी अभिनेत्याला कायम पाठिंबा दिला. मीडिया रिपोर्टनुसार, रेखा आणि संजय दत्त यांच्यामध्ये भावनिक नातं तयार झालं होतं. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. ‘जमीन आसमान’ सिनेमात एकत्र झळकल्यानंतर संजूबाबा आणि रेखा यांनी लग्न केल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला.

एवढंच नाही तर, रेखा कायम संजूबाबा नावाचा सिंदूर लावतात… अशी देखील चर्चा रंगली. रिपोर्टनुसार, दोघांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्यानंतर, संजूबाबाचे वडील सुनील दत्त, रेखा यांना भेटण्यासाठी गेले आणि मुलापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यादिवसानंतर रेखा यांनी संजूबाबापासून दूर राहणं पसंत केलं.

काही दिवसांनंतर रेखा यांनी एका पत्रकार परिषद ठेवली आणि संजूबाबासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं. रेखा म्हणाल्या होत्या, ‘संजय दत्त आणि माझ्याबद्दल रंगणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. मी फक्त माझ्या पारंपरिक लूकवर सिंदूर उठून दिसतो म्हणून सिंदूर लावते…’ असं देखील रेखा म्हणाल्या होत्या.

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.