‘ते प्रेम होते कारण….’ अमिताभ बच्चन यांना इम्प्रेस करण्यासाठी रेखाने केला होता या गोष्टीचा त्याग
रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रेमाबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा ज्येष्ठ पत्रकार पूजा सामंत यांनी एका मुलाखतीत केला आहे. त्यांनी या जोडीबद्दल सांगताना हे देखील सांगितले की रेखा यांनी अमिताभ यांना इम्प्रेस करण्यासाठी त्यांच्या एका आवडीच्या गोष्टीचा त्याग केला होता.

बॉलिवूडमधील काही लव्ह स्टोरी अशा असतात ज्या कधीही विसरल्या जात नाही. मग ती आताची लव्हस्टोरी असो किंवा 70s,80s ची लव्हस्टोरी असो. यातील एकच लव्हस्टोरी म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा यांची. या जोडीची प्रचंड चर्चा झाली. तेव्हाही आणि आजही या जोडीबद्दल कायम बोललं जातं.
रेखा आणि अमिताभ यांच्या नात्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार पूजा सामंत यांनी काय सांगितले?
बिग बी हे तेव्हा विवाहित होते आणि रेखासोबतचे त्यांचे अफेअर चर्चेत होते. रेखा आणि अमिताभ यांच्या नात्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार पूजा सामंत यांनी एका मुलाखतीत बरेच खुलासे केले आहेत. तसेच रेखाचे अमिताभ यांच्यावर किती प्रेम होते तसेच अमिताभ यांच्या प्रेमासाठी , त्यांना इम्प्रेस करण्यासाठी रेखा यांनी काय काय केलं आहे याबद्दलही पूजा यांनी सांगितलं आहे. त्या म्हणाल्या “दोघांमध्ये काही प्रमाणात प्रेम असेल, कारण तो आधीच विवाहित होता.”
रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्यासाठी या गोष्टीचा त्याग केला होता
त्यांनी असेही म्हटले की ‘रेखा ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या लग्नात सिंदूर लावून आल्या होत्या. त्यामुळे तेव्हादेखील सर्वत्र चर्चा झाली होती. हे पाहून ऋषी कपूर आणि नीतू सिंग त्यांच्या खास दिवशी गोंधळून गेले होते असंही पूजा यांनी म्हटले आहे. तसेच पूजाने असाही दावा केला की त्यांच्या सूत्रांनुसार, रेखा अमिताभ यांना प्रभावित करण्यासाठी शाकाहारी झाल्या होत्या. रेखाने देखील एका मुलाखतीत ही गोष्ट मान्य केली होती.
जया यांनी रेखाला दिली होती अशापद्धतीने शेवटची सूचना
पूजा यांनी पुढे सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून अमिताभ यांनी ज्या ज्या मुलाखती दिल्या त्यापैकी एकाही मुलाखतीत एकदाही त्यांनी रेखाचा उल्लेख केला नाही. पूजा म्हणाल्या, ” मी अनेक वेळा अमिताभची मुलाखत घेतली आहे, पण त्यांनी रेखाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे कधीच दिली नाहीत. ते या विषयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचे आणि दुसरीकडे, जया कधीही मुलाखती देत नसत. पण जया बच्चन यांनी एकदा रेखाला त्यांच्या घरी जेवणासाठी बोलावलं होतं. तेव्हा जया यांनी स्पष्ट केले की त्या श्रीमती बच्चन आहेत आणि काहीही झाले तरी त्या नेहमीच या पदावर राहणार. रेखाला त्यांनी दिलेली ती शेवटची सूचना होती आणि तुम्ही स्वतः पाहू शकता की एका क्षणानंतर रेखा आणि अमिताभ यांनी एकत्र काम करणे थांबवले.”
रेखा यांनी अमिताभ बच्चन यांना इम्प्रेस करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या
तसेच पूजा पुढे म्हणाल्या की,अमिताभ बच्चन यांनी 1973 मध्ये जया बच्चनशी लग्न केले होते. या जोडप्याला अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन ही दोन मुलेही होती. त्यामुळे अमिताभ देखील यात रेखाशी असलेल्या प्रेमबंधनात अडकणार नव्हते याची सर्वांना कल्पना होती. पण तरी देखील रेखा मात्र त्यांना इम्प्रेस करण्यासाठी अनेक गोष्टी करत असतं. अमिताभ यांनी जरी कधी रेखाचा उल्लेख केला नसला तरी देखील रेखा मात्र आजही कळत-नकळत त्यांचे बिग बींवरील प्रेम व्यक्त करतच असतात.
