Harman Baweja : हरमन बावेजा आठवतो? प्रियंकाचा बॉयफ्रेंड म्हणून चर्चा, आता एंगेजमेंट

बॉलिवूड अभिनेता हरमन बावेजानं नुकतंच चंदीगडमध्ये साखरपुडा केला आहे. (Herman Baweja got engaged with Sasha Ramchandani)

Harman Baweja : हरमन बावेजा आठवतो? प्रियंकाचा बॉयफ्रेंड म्हणून चर्चा, आता एंगेजमेंट
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 10:47 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता हरमन बावेजानं नुकतंच चंदीगडमध्ये न्युट्रीशन हेल्थ कोच साशा रामचंदानीसोबत साखरपुडा केला आहे. कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांनी इन्स्टाग्रामवर या दोघांचं अभिनंदन केलंय. त्यांच्या साखरपुड्यातील काही फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ही बातमी सर्वप्रथम हरमनची बहीण रोविना बावेजा यांनी शेअर केली होती. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो शेअर करत या जोडप्याला शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देत त्यांनी शाशाचं नव्या कुटूंबात स्वागतही केलं.

“लग्नाचे कार्यक्रम सुरू होण्याची खूप खूप उत्सुकता आहे. तुम्हा दोघांवर खूप प्रेम आहे, ”असं तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

या फोटोवर बिझनेसमॅन राज कुंद्रा आणि अभिनेत्री शमिता शेट्टी यांनी कमेंट करत हरमन आणि साशाचं अभिनंदन केलं आहे.

हरमन हा दिग्दर्शक हॅरी बावेजा आणि चित्रपटाचा निर्माता पम्मी बावेजा यांचा मुलगा आहे. 2008 मध्ये त्यानं ‘लव्ह स्टोरी 2050’द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, या चित्रपट त्याच्या वडिलांनी म्हणजे हॅरी बावेजा यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत झळकली होती मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.

याशिवाय हरमननं व्हिक्टरी, डिश्कियाव, व्हॉट्स यूवर राशी यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.