AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 44 व्या वर्षी कपूर घराण्याची लेक करतेय बॉलिवूडमध्ये एन्ट्री; म्हणाली, ‘आता वाट पाहणं शक्य नाही …’

कपूर घराण्यातील लेक आता एका चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटाचं शुटींग आता पूर्ण झालं असून तिने तिच्या इंस्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे. कोण आहे ती कपूर घराण्यातील लेक जी वयाच्या 44 व्या वर्षी करतेय बॉलिवूडमध्ये एन्ट्री करतेय?

वयाच्या 44 व्या वर्षी कपूर घराण्याची लेक करतेय बॉलिवूडमध्ये एन्ट्री; म्हणाली, 'आता वाट पाहणं शक्य नाही ...'
Riddhima Kapoor Sahni is making her Bollywood debut with DKS movie Image Credit source: instagram
| Updated on: May 31, 2025 | 9:38 AM
Share

कपूर कुटुंबातील अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये आले आहेत, जे इंडस्ट्रीचे सुपरस्टार राहिले आहेत. आता कपूर घराण्यातील आणखी एक लेक बॉलिवूडमध्ये येणार आहे. चित्रपटाचे शुटींगही आता पूर्ण झालं असून ती तिच्या चित्रपटासाठी फारच उत्सुक आहे. कपूर घराण्यातील या लेकीनं पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती आहे. पहिल्यांदाच अभिनेत्री म्हणून आपलं टॅलेंट पडद्यावर दाखवणारी ही कपूर घरातील लेक म्हणजे ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची मुलगी आणि रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा साहनी कपूर. ओटीटी पदार्पणानंतर आता ती चित्रपटांमध्ये प्रवेश करतेय.

कपूर कुटुंबातील आणखी एक लेक बॉलिवूडमध्ये

रिद्धिमा कपूर साहनी लवकरच ‘डीकेएस’ नावाच्या आगामी ड्रामा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. आता, शिमला येथील मशोब्रा येथे 52 दिवसांच्या दीर्घ वेळापत्रकानंतर या चित्रपटाचे शुटींग अखेर संपले आहे. या निमित्ताने रिद्धिमाने इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या सेटवरून एक फोटो शेअर केला ज्यामध्ये तिची आई नीतू, अभिनेत्री सादिया खतीब, सरथ कुमार, अदिती मित्तल आणि इतर कलाकारही दिसत आहे.

चित्रपटाबाबत खास पोस्ट

हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘परिवार’. एवढेच नाही तर रिद्धिमा कपूरने तिच्या पहिल्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करताना एक हृदयस्पर्शी पोस्ट देखील शेअर केली. त्यात लिहिले आहे, “पहिलं हे नेहमीच खास असतं, कारण तेच ‘पहिले’ असतं जे आपण आयुष्यभर शिकत राहू. 52 दिवसांपर्यंत, 200 हून अधिक लोक या हृदयस्पर्शी, मजेदार आणि सुंदर चित्रपटाचे वर्णन करण्यासाठी एकत्र आले. आम्ही कथानक रचले, आम्ही नाचलो, आम्ही हसलो-रडलो आणि जेव्हा हा चित्रपट तुमच्या स्क्रीनवर येईल तेव्हा तुम्हीही या उत्सवात सामील व्हाल. आता या क्षणाची मी जास्त वाट पाहू शकत नाही #DKS.”

सेटवरील कलाकारांसोबत फोटो 

दरम्यान रिद्धिमाचा सह-अभिनेता आणि बालकलाकार, विधान शर्माने रिद्धिमासोबत एक गोंडस फोटो शेअर केला आणि लिहिले आहे की “हा सुंदर प्रवास संपत असताना, आम्ही शेअर केलेले सर्व अद्भुत क्षण, आम्ही हसलेले विनोद, आम्ही एकत्र खेळलेले सजग खेळ, कोणीही नसताना तुम्ही दिलेलं प्रेम मला आठवतं. आमच्या वेळेपेक्षा फक्त एकच गोष्ट मौल्यवान आहे आणि ती म्हणजे आपण तो वेळ कुठे घालवतो आणि मी तो तुमच्यासोबत तो वेळ घालवला याचा मला आनंद आहे. रिद्धिमा मॅडम, तुमच्यावर नेहमीच प्रेम आहे. तुमच्याकडून खूप काही शिकलो आणि तुम्ही निःस्वार्थपणे जे काही दिले ते माझ्या हृदयात कायमचे कोरले जाईल.” असं म्हणत त्याने रिद्धिमाचं प्रेमाने कौतुक केलं आहे.

अद्याप चित्रपटाची तारीख जाहीर केली नाही  

त्याच्याशिवाय, बाल कलाकार स्वर्णा पांडेनेही रिद्धिमासोबतचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये 44 वर्षीय रिद्धिमा तिला मिठी मारताना दिसत आहे. एका वृत्तानुसार, हा चित्रपट आशिष आर मोहन दिग्दर्शित करत आहेत, जे ‘खिलाडी 786’ आणि ‘वेलकम टू कराची’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात रिद्धिमासह नीतू कपूर आणि कपिल शर्मा देखील मुख्य भूमिकेत आहेत. निर्मात्यांनी चित्रपटाचे अधिकृत शीर्षक आणि प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.