AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishabh Pant: ऋषभ पंतच्या अपघातानंतर एअरपोर्टवर दिसली उर्वशी रौतेला; युजर्स म्हणाले “RP ला भेटायला..”

उर्वशी एअरपोर्टवर दिसताच नेटकऱ्यांनी केला ऋषभ पंतचा उल्लेख; क्रिकेटरच्या अपघातानंतर लिहिली होती खास पोस्ट

Rishabh Pant: ऋषभ पंतच्या अपघातानंतर एअरपोर्टवर दिसली उर्वशी रौतेला; युजर्स म्हणाले RP ला भेटायला..
उर्वशी रौतेला, ऋषभ पंतImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 01, 2023 | 8:50 AM
Share

मुंबई: क्रिकेटर ऋषभ पंतच्या अपघाताच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला. कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्याचं कळतंय. त्याला उपचारासाठी इतर रुग्णालयात हलवायचं की नाही याचा निर्णय अजून झाला नसल्याचं पंतच्या कुटुंबीयांनी सांगितलं. देहरादून इथल्या मॅक्स रुग्णालयात पंतवर उपचार सुरू आहेत. दिल्ली टीममधील खेळाडू नितीश राणा, अभिनेते अनिल कपूर, अनुपम खेर यांच्यासह दिल्ली क्रिकेट संघटनेचे संचालक श्याम शर्मा यांनी शनिवारी रुग्णालयात ऋषभची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. यादरम्यान आता अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा एक व्हिडीओ समोर येत आहे.

ऋषभच्या अपघातानंतर उर्वशीची एक पोस्ट व्हायरल झाली होती. स्वत:चा एक फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, ‘प्रार्थना करतेय’. या कॅप्शनवरून उर्वशी ही ऋषभसाठी प्रार्थना करत असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला. या पोस्टनंतर आता उर्वशीचा मुंबई विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल होत आहे. 31 डिसेंबर रोजी उर्वशीला पापाराझींनी विमानतळावर पाहिलं.

View this post on Instagram

A post shared by @varindertchawla

काळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये ती एअरपोर्टवर पोहोचली होती. उर्वशीला विमानतळावर पाहून चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये थेट विचारलं की “तू ऋषभ पंतला भेटायला जात आहेस का?” तर “उर्वशी देहरादूनला जातेय वाटतं,” असं दुसऱ्या युजरने लिहिलं.

उर्वशीने एका मुलाखतीत ‘आरपी’ असा उल्लेख केल्यापासून या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती. उर्वशीचा आरपी हा ऋषभ पंतच आहे, अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू झाली. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दोघांनी एकमेकांना सुनावलंही होतं.

ऋषभ पंतच्या कपाळावर शुक्रवारी प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. कार अपघातात जखमी झालेला पंत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजला मुकणार हे निश्चित झालं आहे. पंतला किमान सहा महिने खेळता येणार नाही.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.