Rishi Kapoor | ‘या’ गोष्टीला कंटाळलेल्या ऋषी कपूर यांचा मोठा निर्णय; पत्नीचा एक सल्ला आणि… !
ऋषी कपूर यांच्या आयुष्यात अशी वेळ आली, जेव्हा त्यांनी सिनेमांची साइनिंग रक्कमही केली परत... अभिनेत्याचा एक महत्त्वाचा निर्णय आणि...

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेते ऋषी कपूर आज आपल्यात नाहीत. त्यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. ऋषी कपूर यांनी ३० एप्रिल २०२० मध्ये अखरेचा श्वास घेतला. ऋषी कपूर यांच्या निधनामुळे कुटुंबासह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. कपूर कुटुंबाच्या कोणत्याही कार्यक्रमात आजही सदस्यांना त्यांनी कमी भासते. ऋषी कपूर आज आपल्यात नसले तरी त्यांच्या असंख्य आठवणी कुटुंबाच्या आणि चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. ऋषी कपूर यांनी त्यांच्या करियरमध्ये अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण एक काळ असा आला जेव्हा ऋषी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा संपली आणि त्यांनी अभिनयाला अलविदा करण्याचं ठरवलं होतं. ऋषी कपूर तेव्हा रोमँटिक सिनेमांसाठी ओळखले जायचे.
जेव्हा ऋषी कपूर यांनी अभिनयाला अलविदा करण्याचं ठरवलं तेव्हा त्यांचा एकही सिनेमा फ्लॉप झालेला नव्हता… एका मुलाखतीत ऋषी कपूर यांनी अभिनय का सोडायचा आहे… याचं कारण सांगितलं होतं. ऋषी कपूर म्हणाले होते, ‘२५ वर्ष हिरो म्हणून काम करण्याचा कंटाळा आला आहे…’ एकापेक्षा एक सिनेमांमुळे ऋषी कपूर यांचं नाव मोठं होत होतं, पण फॅन्सी स्वेटर्समध्ये झाडांभोवती धावत मुलींचा पाठलाग करून थकले होते… असं मत त्यांनी मुलाखतीत मांडलं होतं.
ऋषी कपूर यांच्या निर्णयाबद्दल नीतू कपूर यांनी देखील मोठं वक्तव्य केलं होत. नीतू कपूर म्हणाल्या होत्या की, ‘कामात मन लागत नसेल तर, ते काम करू नका…’ असा सल्ला नीतू कपूर यांनी ऋषी यांनी दिला होता. नीतू कपूर यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर ऋषी कपूर यांनी अनेक सिनेमांमधून काढता पाय घेतला. एवढंच नाही तर, त्यांनी सिनेमांची साइनिंग रक्कमही परत केली होती…
रोमँटिक सिनेमांमध्ये काम न करण्याचं ठरवल्यानंतर ऋषी कपूर ‘राजू चाचा’ आणि ‘कुछ खट्टा कुछ मिठा’ सिनेमांमध्ये झळकले… ऋषी कपूर यांच्या असंख्य आठवणी आजही चाहत्यांमध्ये जिवंत आहेत. सोशल मीडियावर देखील ऋषी कपूर यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
ऋषी कपूर यांचं 30 एप्रिल 2020 रोजी निधन झालं. ल्यूकेमिया अर्थात रक्ताच्या कर्करोगावरील उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ऋषी कपूर यांनी जवळपास 120 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. गेल्या 45 वर्षांहून अधिक काळ त्यांनी सिनेसृष्टीत गाजवला होता. 2008 मध्ये फिल्मफेअर लाइफटाइम अचिवमेंट पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं होतं. ऋषी कपूर यांनी 1970 साली प्रदर्शित झालेल्या ‘मेरा नाम जोकर’ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
