Rishi Kapoor died | पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून शोक व्यक्त, सिनेकलाकारही हळहळले

बॉलिवूडचा ‘चॉकलेट हिरो’ अशी बिरुदावली मिरवणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी (30 एप्रिल) निधन (Rishi Kapoor died) झाले.

Rishi Kapoor died | पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून शोक व्यक्त, सिनेकलाकारही हळहळले
Follow us
| Updated on: Apr 30, 2020 | 11:54 AM

मुंबई : बॉलिवूडचा ‘चॉकलेट हिरो’ अशी बिरुदावली मिरवणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी (30 एप्रिल) निधन (Rishi Kapoor died) झाले. ते 67 वर्षांचे होते. कर्करोगावरील उपचारादरम्यान ऋषी कपूर यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील ‘सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन’ हॉस्पिटलमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. तर काल (29 एप्रिल) दुसरीकडे अभिनेते इरफान खान यांचे निधन झाले. यामुळे राजकीय क्षेत्रासह, सिनेसृष्टीतील कलाकारांनीही हळहळ व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली

“ऋषी कपूर हे अष्टपैलू, प्रेमळ आणि चैतन्यशील होते. मला अजूनही आमचं सोशल मीडियावरील बोलणं अजूनही आठवतं. ते भारतीय सिनेसृष्टीच्या प्रगतीसाठी नेहमीच उत्साही असायचे. त्यांचे निधनामुळे मला फार दु:ख झाले. मी त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहे, असे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली.

राज्यपालांकडून शोक व्यक्त

“भारतीय चित्रपट सृष्टीतील ‘पहिले घराणे’ म्हणून लौकिक असणाऱ्या कपूर घराण्यात जन्मलेल्या ऋषी कपूर यांने सिनेसृष्टीला प्रदीर्घ काळ मोठे योगदान दिले. चित्रपट सृष्टीच्या सुर्वण कालखंडात अनेक दिग्गज अभिनेते व महानायकांच्या मांदियाळीत ऋषी कपूर यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला, अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिली

देखण्या आणि सहज सुंदर अभिनयाने साकारलेले ऋषी कपूर यांचे अनेक चित्रपट लोकांच्या दीर्घकाल स्मरणात राहतील. इरफान खान यांच्या मागोमाग ऋषी कपूर यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे,” असेही राज्यपाल म्हणाले.

ऋषी कपूर यांच्या जाण्याने कला क्षेत्राची हानी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

“भारतीय चित्रपट सृष्टीसाठी मोठे योगदान देणाऱ्या घराण्याचा वारसा असणारे, स्वतंत्र प्रतिभेचे, मनस्वी आणि निखळ अभिनेते ऋषी कपूर यांच्या जाण्याने कला क्षेत्राची हानी झाली आहे. ते चित्रपट सृष्टीतील दोन पिढ्यांच्या दरम्यान मार्गदर्शक दूवा होते, हा दूवा निखळला आहे,” अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेता ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अजित पवारांचं ट्विट

“ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानं हसतमुख,हरहुन्नरी,सदाबहार अभिनेता आपण गमावला.आनंदी,उत्साही राहणारं असं त्यांचं चिरतरुण व्यक्तिमत्वं होतं.त्यांच्या अभिनयानं रसिकांना निखळ आनंद दिला.भारतीय चित्रपट विश्वात त्यांचं नाव,त्यांचा अभिनय अजरामर राहील!त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!,” असे ट्विट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

राहुल गांधीकडून श्रद्धांजली 

“अभिनेते इरफान खान यांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी ऋषी कपूर यांचे निधन होणे हे भारतीय सिनेमासाठी फार मोठे नुकसान आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली. भारतीय सिनेसृष्टीसाठी हा आठवडा फार भयानक आहे. या आठवड्यात ऋषी कपूर, इरफान खान अशा दोन दिग्गज नेत्यांचे निधन झआले. ते अतिशय उत्कृष्ट अभिनेते होते. अनेक पिढ्यांपिढ्या त्यांची नेहमीच प्रशंसा करत. त्यांची खूप आठवण येईल,” असे म्हणत राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे श्रद्धांजली अर्पण केली.

अभिनेता अक्षय कुमारची प्रतिक्रिया 

“मला असं वाटतं की आपण एका वाईट स्वप्नातून जात आहोत, आताच ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी ऐकली आणि मन सुन्न झाले. ते एक ज्येष्ठ अभिनेते, एक महान सह कलाकार आणि एक चांगली फॅमिली फ्रेंड होते,” अशी प्रतिक्रिया अभिनेता अक्षय कुमार यांनी दिली.

अभिनेता फरहान अख्तर हळहळला

तुमच्यासारखं दुसरं कोणी होऊ शकत नाही, स्वरा भास्कर यांचं ट्विट

(Rishi Kapoor died)

संबंधित बातम्या :

PHOTO : ऋषी कपूर यांचे बाल कलाकार ते तारुण्यातले न पाहिलेले फोटो

Rishi Kapoor | बॉबी ते नगिना, ऋषी कपूर यांचे गाजलेले चित्रपट

Rishi Kapoor | बॉलिवूडचा ‘चॉकलेट हिरो’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन

Non Stop LIVE Update
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.