‘रामायणात कुठे लिहिलंय?’, फटाक्यांच्या ट्विटवरून ट्रोल करणाऱ्यांना रुबिना दिलैकचं उत्तर

अभिनेत्री रुबिना दिलैकने फटाक्यांबद्दल एक ट्विट केलं होतं. फटाक्यांच्या आवाजामुळे झोपमोड झाल्याची तक्रार तिने केली. त्यावरून तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. तिच्यावर हिंदूविरोधी असल्याची टीका केली. या टीकाकारांना आता रुबिनाने तिच्याच अंदाजात उत्तर दिलं आहे.

'रामायणात कुठे लिहिलंय?', फटाक्यांच्या ट्विटवरून ट्रोल करणाऱ्यांना रुबिना दिलैकचं उत्तर
Rubina DilaikImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 16, 2023 | 1:36 PM

मुंबई : 16 नोव्हेंबर 2023 | बिग बॉसची माजी विजेती आणि प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या तिच्या काही ट्विट्समुळे चर्चेत आली आहे. दिवाळीत होणारं ध्वनी आणि वायू प्रदूषण हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा मुद्दा ठरला आहे. त्यातच रुबिनाने दिवाळीबद्दल एक ट्विट केलं. ज्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘ज्यांच्याशी संबंधित असेल त्यांच्यासाठी.. दिवाळी संपली आहे, कृपया फटाके फोडणं बंद करा’, असं तिने तिच्या ट्विटमध्ये म्हटलंय. फटाक्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे रात्रभर झोप नसल्याचीही तक्रार तिने केली आहे.

रुबिनाने लिहिलं, ’10 नोव्हेंबरपासून पहाटे 3 वाजेपर्यंत अविरत फटाके फोडले जात आहेत. आता थांबवा हे सगळं. वायू प्रदूषण तर आहेच, पण ध्वनी प्रदूषणामुळे आमची झोपमोड होतेय.’ या ट्विटनंतर काही वेळाने तिने काही स्क्रीनशॉट्स पोस्ट केले. ज्यामध्ये नेटकऱ्यांनी तिला तिची पोस्ट डिलिट करण्यास सांगितलं. ‘दिवाळीच्या दिवशी तू केलेलं हिंदूविरोधी प्रचारकी ट्विट लगेच डिलिट कर. अन्यथा आम्ही तुझ्याविरोधात निषेधाची मोहीम सुरू करू’, असं त्यात लिहिलं होतं. काहींनी तिला एसी, महागडे आलिशान कार न वापरण्याचा सल्ला दिला.

हे सुद्धा वाचा

या सर्व ट्रोलिंगनंतर वैतागलेल्या रुबिनाने सवाल केला, ‘हिंदूविरोधी? तुमचं डोकं खरंच ठिकाणावर आहे का? माझ्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कमेंट करायला येऊ नका. हे ज्ञान नाही, मिस्टर अतिहुशार मूर्ख विपुल श्रीसथ. तुमच्यापेक्षा जास्त आम्ही सण-उत्सव साजरे करतो, पण दुसऱ्यांना त्रास देत नाही.’ रुबिना इथेच थांबली नाही. तर तिने दिवाळी सणाचा नेमका अर्थसुद्धा नेटकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला.

‘दिवाळी, प्रकाशाचा सण, श्रीराम अयोध्येत परतल्याचा जल्लोष. रामायणात 10 दिवस फटाके फोडण्याचा उल्लेख नव्हता. त्यामुळे स्वत:ला हिंदू प्रचारक म्हणणाऱ्यांनो, तुमचे बनावट आयडी आणि पेड अकाऊंट्सकडे लक्ष वेधण्यासाठी दुसऱ्या कोणाला तरी शोधा. माझ्यावर टीका करण्याची हिंमत करू नका’, अशा शब्दांत रुबिनाने ट्रोलर्सना फटकारलं.

शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा.
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी.
नितेश राणेंची सैफच्या हल्ल्यावर शंका, 'मला संशय, खरंच चाकू मारला की..'
नितेश राणेंची सैफच्या हल्ल्यावर शंका, 'मला संशय, खरंच चाकू मारला की..'.
ट्रम्पच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील 20 हजार भारतीय मायदेशी परतणार?
ट्रम्पच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील 20 हजार भारतीय मायदेशी परतणार?.
वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणता
वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणता.
Saif Ali Khan Attacked : 'सैफवर जीवघेणा हल्ला तर 'तो' इतका फिट कसा?'
Saif Ali Khan Attacked : 'सैफवर जीवघेणा हल्ला तर 'तो' इतका फिट कसा?'.
एक अफवा,11 जणांचा मृत्यू, पुष्पकमधून उड्या, दुसऱ्या बाजून ट्रेनन चिरडल
एक अफवा,11 जणांचा मृत्यू, पुष्पकमधून उड्या, दुसऱ्या बाजून ट्रेनन चिरडल.