हळदी साडी, डोक्यावर पदर, कपाळाला मुंडावळ्या, हिरवा चुडा; शेवटी जब्याला शालू भेटली? फोटो येताच नेटकऱ्यांना आश्चर्य

सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरात यांनी 'फँड्री' चित्रपटात साकारलेल्या जब्या आणि शालूच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. नुकताच राजेश्वरीने सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो चर्चेत आहे, ज्यात ती आणि सोमनाथ लग्नाच्या पेहरावात दिसत आहेत. यामुळे दोघांनी गुपचूप लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, राजेश्वरीने फोटोबद्दल काहीही स्पष्ट केलेले नाही.

हळदी साडी, डोक्यावर पदर, कपाळाला मुंडावळ्या, हिरवा चुडा; शेवटी जब्याला शालू भेटली? फोटो येताच नेटकऱ्यांना आश्चर्य
Fandry Jabya Shaloo Wedding,
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 2:10 PM

शालू आणि जब्या आठवत असतील ना, हो बरोबर ओळखलंत तोच जब्या जो शालूला मिळवण्यासाठी काळी चिणी शोधत होता. अहो अखेर जब्याला काळी चिमणी घावली बरं का. कारण जब्या आणि शालूने गुपचूप लग्न केल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत. कारण दोघांचाही एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलं झाला आहे.

जब्या अन् शालूचा फोटो चर्चेत

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’10 वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरात हे नवखे कलाकार झळकले होते. या चित्रपटात दोघांनी जब्या आणि शालूची भूमिका साकारली होती. ‘फँड्री’ने बॉक्स ऑफिसवर त्याकाळी रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. चित्रपटातील गाणी आणि काळ्या चिमणीचा डायलॉग हे प्रचंड गाजले. आता हे दोन्ही कलाकार मोठे झाले आहेत. याशिवाय सोशल मीडियावर देखील राजेश्वरी आणि सोमनाथ हे दोघं कायम सक्रिय असतात.

‘फँड्री’मधली जब्या आणि शालूची जोडी प्रेक्षकांच्या एवढी पसंतीस उतरली की, आजही सोमनाथ आणि राजेश्वरीचा उल्लेख हा जब्या आणि शालू असाच केला जातो. नुकताच राजेश्वरीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक फोटो सर्वत्र चर्चेत आला आहे.

खरंच लग्न केलं का?

पिवळी हळदीची साडी, डोक्यावर पदर, कपाळाला मुंडावळ्या, हातात हिरवा चुडा असा लूक शालू म्हणजे राजेश्वरीचा दिसतोय तर, तिच्या बाजूला नवरदेवाच्या पेहरावात सोमनाथही डोक्याला मुंडावळ्या बांधून पाटावर बसल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोमुळे दोघंही गुपचूप लग्न केलं की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

राजेश्वरी आणि सोमनाथ यांच्या फोटोंवर याधाही ‘लग्न करा’, ‘तुमची जोडी छान दिसते’ वैगरे अशा चाहत्यांचे कमेंट आलेले आहेत. मात्रा आता राजेश्वरीने थेट लग्नाच्या मंडपातील फोटो शेअर करत सर्वांना धक्का दिला आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने फोटोवर ‘सर सुखाची श्रावणी…’ हे गाणं लावलं आहे. मात्र, कॅप्शनमध्ये कसलाही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे दोघांचं खरंच लग्न आहे की, आगामी नव्या कोणत्या चित्रपटातील हा फोटो आहे याबाबत अजून काहीच खुलासा झालेला नाही.

Non Stop LIVE Update
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....