AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिच्यामुळे आजही श्रियाला….दत्तक घेतलेल्या मुलीनेच केले सचिन पिळगावर अन् पत्नी सुप्रियावर गंभीर आरोप

सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांच्याप्रमाणे त्यांची लेक श्रिया देखील अभिनयात आपलं नाव कमावत आहे. पण  हे फार कमी जणांना माहित असेल की तिच्या जन्माआधी सचिन-सुप्रिया यांनी एका मुलीला दत्तक घेतलं होतं. पण नंतर त्या मुलीनेच त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याचं म्हटलं जातं.  नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊयात. 

तिच्यामुळे आजही श्रियाला....दत्तक घेतलेल्या मुलीनेच केले सचिन पिळगावर अन् पत्नी सुप्रियावर गंभीर आरोप
Sachin Pilgaonkar Adopted Daughter Serious AllegationsImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 11, 2025 | 11:34 AM
Share

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली एक खास ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणजे सचिन पिळगांवकर हे चित्रपटांमुळे तसेच त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत असतात. सचिन पिळगावकर हे नेहमी त्यांच्या चित्रपटांच्या तसेच त्यांच्या अनुभवाबद्दल सांगताना दिसतात. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. सचिन पिळगावकर तसेच सुप्रिया पिळगांवकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता त्यांची लेक श्रिया पिळगांवकर देखील अभिनयात आपलं नाव कमावतेय.

श्रिया ही त्यांची खरी मुलगी कि दत्तक?

परंतू सचिन पिळगांवकर यांच्या आयुष्यातील एक गोष्ट नक्कीच फार कमी लोकांना माहित असेल की सचिन आणि सुप्रिया यांनी श्रियाच्या जन्माआधी एका मुलीला दत्तक घेतलं होतं. कारण श्रिया लहान असताना अशा बऱ्याच अफवा येत होत्या की ती त्यांची दत्तक मुलगी आहे.यावर खुलासा करत सचिन पिळगांवकरांनी हे स्पष्ट केलं आहे. श्रिया ही त्यांची खरी मुलगी असून त्यांची दत्तक मुलगी दुसरी आहे. पण या मुलीने मोठं झाल्यावर त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याचंही म्हटलं जातं. नक्की काय सत्य आहे ते जाणून घेऊयात.

श्रियाच्या जन्मापूर्वी एका मुलीला दत्तक घेतलं होतं 

सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची मुलगी श्रियाला सगळेचजण ओळखतात. पण श्रियाच्या जन्मापूर्वी सुप्रिया आणि सचिन यांनी करिष्मा मखनी नावाच्या मुलीला त्यांनी दत्तक घेतलं होतं. या मुलीचे वडील सचिन यांचे चांगले मित्र होते. दरम्यान सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या ‘हाच माझा मार्ग एकला’ या पुस्तकात या घटनेचा उल्लेखही केला आहे. याविषयी त्यांनी एका मुलाखतीतही भाष्य केलं होतं.

दत्तक मुलगी श्रीमंत घरातील 

मिळालेल्या माहितीनुसार करिष्मा ही अतिशय श्रीमंत घरातील मुलगी. ती लहान असताना तिची आई खूप आजारी होती. त्यामुळे तिचे वडील रेस्टॉरंटमध्येच तिला घेऊन राहायचे. अशाच एका भेटीत सचिन-सुप्रिया यांना करिष्मा म्हणजे किट्टूविषयी समजलं आणि त्यांनी तिला घरी आणण्याचा निर्णय घेतला. सुप्रिया यांनी मनापासून किट्टूचा सांभाळ केला. त्यावेळी ती तीन-चार वर्षांची होती.

उत्तम पालनपोषण केलं

सचिन आणि किट्टूच्या वडिलांनी एकत्र येऊन किट्टू फिल्म्स ही चित्रपट कंपनी देखील स्थापन केली होती. पण नंतर त्यांच्यात काही गैरसमज झाले आणि त्यांनी ही कंपनी बंद केली. किट्टूचे वडील येऊन तिला लंडनला घेऊन गेले. सचिन आणि सुप्रिया यांनी तिला कायदेशीर रित्या दत्तक घेतलं नव्हतं. पण ते तिला मुलगी माणून तिचे त्यांनी उत्तम पालनपोषण केलं होतं. इतकाच नाही तर सिनेमातही तिला भूमिका दिल्या होत्या.

मात्र करिष्माच्या वडिलांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता तिला परत घेऊन गेल्यामुळे पिळगावकर कुटूंबाला या गोष्टीचा धक्का बसला होता. सचिन यांनी किडनॅपिंगचे आरोपही केले होते. पण हे आरोप त्या कुटूंबाने फेटाळून लावले.

दत्तक मुलीने उत्तम पालनपोषण केलं

करिष्मा लंडनवरून परत मुंबईत अभिनय करण्यासाठी आली होती. तेव्हा तिने सचिन आणि सुप्रिया यांच्याकडे मदत मागितली. त्यांनी तिला पुन्हा स्वीकारलंही. त्यानंतरही ती सहा-सात महिने त्यांच्याकडे राहिली. पण या दरम्यान तिने अभिनयाचे क्लासेस बुडवणे , दिलेले सल्ले न ऐकणे अशा गोष्टी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिचा इंडस्ट्रीत टिकाव लागला नाही अखेर ती पुन्हा लंडनला परत गेली. त्यानंतर तिने आणि तिच्या बाबानी मिळून एक पत्रकार परिषद घेतली. यात तिने सचिन आणि सुप्रिया यांच्यावर गंभीर आरोपही केले.

श्रिया सचिन-सुप्रिया यांची दत्तक मुलगी असल्याचा गैरसमज

सचिन यांनी सांगितल्या प्रमाणे किट्टूमुळे काहीजणांमध्ये श्रिया ही सचिन-सुप्रिया यांची दत्तक मुलगी असल्याचा गैरसमजही निर्माण झाला होता. आणि तो बराच काळ तसाच टिकून होता. त्यामुळे श्रियाला ती त्यांची सख्खी मुलगी असल्याचं आजही अनेकांना सांगावं लागतं. हा गैरसमज अजूनही लोकांच्या मनात आहे.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.