AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जमिनीवर पडलेले संजीव कपूर, सीपीआर दिलं पण…, शेवटच्या क्षणी अशी होती अभिनेत्याची अवस्था, सचिन पिळगांवकरांचा मोठा खुलासा

वयाच्या 47 व्या वर्षी अभिनेते संजीव कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. पण मृत्यूच्या आधी त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं, याबद्दल अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला.

जमिनीवर पडलेले संजीव कपूर, सीपीआर दिलं पण..., शेवटच्या क्षणी अशी होती अभिनेत्याची अवस्था, सचिन पिळगांवकरांचा मोठा खुलासा
संजीव कपूर - सचिन पिळगांवकर
| Updated on: Jul 31, 2026 | 1:51 PM
Share

झगमगत्या विश्वात अशा काही घटना घडतात, ज्या खरंच वेदनादायी असतात. ज्या सेलिब्रिटींनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, तेच सेलिब्रिटी चाहत्यांना रडवून गेले. अभिनेते संजीव कुमार यांनी देखील फार कमी वयात अखेरचा श्वास घेतला. पण मृत्यूपूर्वी संजीव यांच्या घरातील वातावरण कसं होतं याबद्दल अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी मोठा खुलासा केला आहे. पिळगांवकर यांनी सांगितल्यानुसार, संजीव कुमार यांनी सचिन यांना भेटण्यासाठी सकाळी घरी बोलावलं होतं. पण काम असल्यामुळे पिळगांवकर दुपारी पोहोचले. पण तोपर्यंत उशीर झालेला. संजीव कुमार यांनी अखेरचा श्वास घेतलेला. पण तेव्हा नेमकं काय झालं, याबद्दल सचिन यांनी मोठा खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत सचिन म्हणालेले, संजीव कुमार यांनी सचिन यांना सकाळी भेटालयला बोलावलं होतं, पण काही काम असल्यामुळे सचिन दुपारी 2.30 वाजता संजीव यांच्या घरी पोहोचले. पण तोपर्यंत उशीर झालेला. संजीव यांची प्रकृती खालावलेली आणि त्याचं निधन झालं आहे, हे देखील कोणाला माहिती नव्हतं… तेव्हा नेमकं काय घडलेलं, यावर सचिन यांनी मोठा खुलासा केलेला…

सचिन मुलाखतीत म्हणालेले, ‘मी दुपारी त्यांच्या (संजीव कपूर) घरी पोहोचलो… तेव्हा मला सांगण्यात आलं, ते त्यांच्या खोलीत आहे आणि अंघोळ करत आहेत. मी जवळपास अर्धा तास त्यांची वाट पाहिली… पण ते आलेच नाहीत. त्यानंतर मी घरातील स्टाफला विचारलं, ‘त्यांची तब्येत ठिक नाही का?’ यावर ते म्हणाले नाही… त्यांचे पीए डॉक्टरांना बोलावण्यासाठी गेले आहेत. थोड्या वेळात जमनादास आणि डॉ.गांधी त्यांच्या घरी आले. मी विचारलं काय झालं आहे. यावर डॉक्टरांनी सांगितलं, रात्री त्यांना उलटी झालेली आणि रात्री 3 – 4 वाजेपर्यंत ते कामच करत होतं…’

‘तेव्हा मला प्रचंड राग आला. तब्येत ठिक नाही तरी एवढ्या रात्री काम करण्याची काय गरज होती.. मला काहीतरी गडबड आहे.. असं कळू लागलेलं आणि अंघोळीला एवढा वेळ का लागतो? असा प्रश्न देखील मला सतावत होता. पण मी त्यांच्या खोलीत जाण्याचा निर्णय घेतला. मला वाटलं काय असेल, ते कपडे बदलत असतील, तर माफी मागेल आणि खोलीचा दरवाजा ओढून घेईल…’

‘मी बेडरुमचा दरवाजा खोलला आणि समोरचं दृश्य फार भयानक होतं. सुरुवातीला मला खोलीत काहीच दिसलं नाही. त्यानंतर मला कारपेटवर दोन पाय दिसले… मी पुढे गेलो आणि पाहिलं तर संजीव कपूर जमीनीवर पडलेले होते. मी डॉक्टरांना बोलावलं. पण तोपर्यंत उशीर झालेला. डॉक्टरांनी संजीव यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, सीपीआर देखील देण्यात आलं. पण डॉक्टरांनी सांगितलं, त्यांचं निधन फार आधी झालं आहे…’, सांगायचं झालं तर, संजिव कपूर यांचं निधन 6 नोव्हेंबर 1985 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने झालं… वयाच्या 47 वर्षी संजीव कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Follow Us
तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश
अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद...
Sansad Bhavan Park | अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद भवनाबाहेर आंदोलन
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल; विखे पाटलांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले...
रक्ताने माखलेल्या गणवेशाची कहाणी सांगताना कुटुंबीयांना अश्रू अनावर
NEET आंदोलनानंतर पोलिसांच्या कुटुंबीयांची पत्रकार परिषद; रक्ताने माखलेल्या गणवेशाची कहाणी सांगताना कुटुंबीयांना अश्रू अनावर
हिंगोलीत कयाधू नदीला पूर! पुढील 48 तास अतिमहत्त्वाचे; प्रशासनाचा इशारा
ब्रेकिंग: हिंगोलीत कयाधू नदीला पूर! पुढील 48 तास अतिमहत्त्वाचे; प्रशासनाचा इशारा
जळगावमध्ये पावसाचा कहर! हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडले
Jalgaon | जळगावमध्ये पावसाचा कहर! हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडले; नद्यांना पूर
राज्यात पावसाचा हाय अलर्ट! नाशिकला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना...
Maharashtra Rain Alert | राज्यात पावसाचा हाय अलर्ट! नाशिकला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
दगडावरून आधार शोधणाऱ्यांना नोबेल मिळालाच पाहिजे...
Sanjay Raut Press | दगडावरून आधार शोधणाऱ्यांना नोबेल मिळालाच पाहिजे; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर खोचक निशाणा
CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली
Delhi Police | CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली भूमिका, म्हणाले आता...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...