महिलेने 500 रुपये काढले आणि मला… सचिन पिळगांवकर यांनी सांगितला मोठा किस्सा, बॅडमिंटन खेळून बाहेर..
सचिन पिळगांवकर सध्या त्यांच्या विधानामुळे तूफान चर्चेत आहेत. आता त्यांनी एका महिलेबद्दल मोठा किस्सा सांगितला आहे. मुंबईमध्ये त्यांच्यासोबत नेमके काय घडले हे त्यांनी सांगितले. ज्याच व्हिडीओ व्हायरल होतोय.

प्रसिद्ध अभिनेते, गायक आणि दिग्दर्शक म्हणून सचिन पिळगांवकर यांनी खास ओळख निर्माण केली. मराठीसह त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत ठसा उमटवला. अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर यांची जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. काही दिवसांपूर्वी त्यांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला. सचिन पिळगांवकर यांच्याबद्दल चाहत्यांच्या मनात प्रचंड क्रेझ आहे. मागील काही दिवसांपासून सचिन पिळगांवकर हे त्यांच्या विधानांमुळे तूफान चर्चेत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच उर्दू भाषेबद्दल मोठे विधान केले. ज्यानंतर काही स्तरातून त्यांच्यावर जोरदार टीका देखील झाली. त्यामध्येच आता सचिन पिळगांवकर यांचा दुसरा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ते एका महिलेबद्दल बोलत असून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधून बाहेर पडताना आपल्यासोबत नेमके काय घडले हे सांगताना ते दिसले. ही घटना तीन महिन्यांपूर्वी घडल्याचेही सांगताना ते दिसले.सचिन पिळगांवकर यांनी म्हटले की, मी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधून बॅडमिंटन खेळून बाहेर पडत होतो आणि तिथे लहान मुलांना अॅरोबिक्ससाठी आणणाऱ्या आया किंवा महिला असतात. त्यामधीलच एक आई होती.
View this post on Instagram
तिच्यासोबत तिचा एक लहान मुलगा होता. मला वाटते की, ती साधारणपणे 35 ते 34 वर्षांची असेल. तिने मला बघितले आणि म्हणाली, अरे सचिन जी सचिन जी… नमस्कार नमस्कार… माझे नाव हे आहे वगैरे तिने मला सर्व सांगितले. तिने मला म्हटले की, तुमचे काम मी बघत आले आहे… मला तुमचे काम खूप जास्त आवडले आहे. लहानपणीचे पण मी चित्रपट युट्युबवर बघितले.. मला खूप जास्त आवडले. कटार काळजात घुसलीमध्ये काय काम केलंय तुम्ही…
इतके वर्ष तुम्ही काम केलंय.. यामुळे मला तुम्हाला काहीतरी द्यायचे आहे म्हणते तिने पर्स उघडली आणि त्यामधून 500 रूपये काढले आणि मला म्हटले की, तुम्ही हे माझ्याकडून घ्या.. माझ्याकडे दुसरे काही नाही ओ तुम्हाला द्यायला. आता सचिन पिळगांवकर यांनी सांगितलेला हा किस्सा जोरदार व्हायरल होताना दिसतोय. सचिन पिळगांवकर हे एका मुलाखतीवेळी हे सांगताना दिसत आहेत. मात्र, या व्हिडीओ खाली लोक कमेंट करत आम्ही तुम्हाला 500 रूपये देतो सर पण तुम्ही हे सांगणे बंद करा म्हणताना दिसत आहेत.
