सचिन तेंडुलकरच्या लेकीचे महागडे शौक; ड्रेस अन् व्हाईट गोल्डचे ब्रेसलेट, किंमत ऐकून अवाक् व्हाल
सारा तेंडुलकरने एका पार्टीत घातलेल्या शिमरी ड्रेस आणि व्हाइट गोल्डच्या ब्रेसलेटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्या ड्रेसची आणि ब्रेसलेटची किंमत लाखोंच्या घरात आहे. साराचा हा स्टायलिश लूक आणि महागडे दागिने सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत.

सचिन तेंडूलकरची लेक सारा तेंडुलकरच्या नेहमी लव्ह लाईफच्या आणि तिने केलेल्या पार्टीच्या चर्चा होतान दिसतात. कधी ती तिच्या मैत्रिणींसोबत, तर कधी कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसते. सारा तिच्या लूकचीही तेवढीच काळजी घेताना नेहमी दिसते. सारा तेंडुलकरने भलेही फिल्मी दुनियेत प्रवेश केला नसेल, पण स्टाईलच्या बाबतीत ती कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. साराचा ड्रेसिंग सेन्सही अप्रतिम आहे. त्यामुळेच तिने ज्या काही गोष्टी स्टाइल केल्या, त्या सर्वांचे लक्ष वेधून घेतात.
- Vintage Alhambra Bracelet
लूक आणि ब्रेसलेटने सर्वांचेच लक्ष वेधले
साराचा असाच एक लूक आणि विशेषत: तिने घातलेले दागिने प्रचंड चर्चेत आले आहेत. साराने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यात तिचा अप्रतिम लूक पाहायला मिळत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या क्रूझव प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये साराही सहभागी झाली होती तेव्हाचा तो फोटो आहे.
- Sara Tendulkar Vintage Alhambra Bracelet
सारा मिरर सेल्फी घेताना दिसत आहे. जिथे तिने ॲनीच्या लेबलचा ब्लॅक ओरियन ड्रेस घातला असून जो पूर्णपणे शिमरी आहे. टर्निंग स्ट्रॅप्स असलेल्या ड्रेसमध्ये यू नेकलाइन आहे आणि कटआउट स्टाइलमध्ये ड्रेसची खालची डिझाईन दिसत आहे. मात्र या सगळ्यांमध्ये या फोटोमध्ये साराने घातलेल्या ब्रेसलेटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ज्याची किंमत जवळपास लाखोंच्या घरात आहे .
व्हाइट गोल्डपासून बनवलेलं ब्रेसलेट
साराने घातलेलं ब्रेसलेट विंटेज अलहंब्रामधील 5 मोटिफसह आहे. जे 18 कॅरेट व्हाईट गोल्डपासून बनवले आहे. त्याची किंमत ही जवळपास 3 लाखांहून अधिक आहे .इतकंच नाही तर साराचा ड्रेसही खूपच स्टनिंग दिसत रिपोर्टनुसार ड्रेसची किंमत ही 95 हजार रुपये आहे, तर ब्रॅण्डच्या अधिकृत साइटवर ब्रेसलेटची किंमत 4,600 डॉलर्स म्हणजेच 3,88,183.69 रुपये देण्यात आली आहे.

Sara Tendulkar Vintage Alhambra Bracelet
साराने तिच्या या स्टनिंग आउटफिटला फायनर टच देण्यासाठी ड्रेसला मॅचिंग असे कानातले, काळ्या रंगाचे हाय हिल्स घातल्या आहेत. तसेच तिने हलकासा मेकअप करत केसरचनाही अगदीच साधी- सिंपल ठेवली आहे. एकंदरितच साराचा हा लूक फारच ग्लॅमरस आणि मुख्य म्हणजे तिला शोभणारा होता हे तिच्या फोटोंमधून दिसत आहे.

