AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्रिज की सुटकेस? स्वरा भास्करच्या रिसेप्शनचे फोटो पाहून साध्वी प्राची यांनी केलं ट्विट, नेटकरी म्हणाले..

स्वरा आणि फहादने स्पेशल मॅरेज ॲक्टअंतर्गत 6 जानेवारी रोजी कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर आता मार्च महिन्यात दोघांचा हळद, मेहंदीचा कार्यक्रम आणि रिसेप्शन पार पडलं. या रिसेप्शनला बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होते.

फ्रिज की सुटकेस? स्वरा भास्करच्या रिसेप्शनचे फोटो पाहून साध्वी प्राची यांनी केलं ट्विट, नेटकरी म्हणाले..
Swara Bhasker, Fahad Ahmed and Sadhvi PrachiImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 19, 2023 | 11:49 AM
Share

नवी दिल्ली : अभिनेत्री स्वरा भास्करने प्रियकर फहाद अहमदशी लग्न केलं. या दोघांनी कॉर्ट मॅरेज केल्यानंतर जवळपास 40 दिवसांनी लग्नाचा खुलासा केला. त्यानंतर नुकताच स्वरा आणि फहादचा हळदी, मेहंदीचा कार्यक्रम आणि रिसेप्शनसुद्धा पार पडला. या रिसेप्शनला बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळींची उपस्थिती पहायला मिळाली. स्वराने ट्विटरवर फहादसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. त्यावर व्हीएचपी नेत्या साध्वी प्राची यांनी असं काही ट्विट केलंय, जे पाहून नेटकरी त्यांच्यावर भडकले आहेत. ‘तुम्हीसुद्धा माणूसच आहात ना’, असा प्रश्न नेटकरी त्यांना करत आहेत.

साध्वी प्राची यांचं ट्विट-

स्वरा भास्करच्या रिसेप्शन फोटोवर साध्वी प्राची यांनी कमेंट केली, ‘काही अंदाज? फ्रिज की सुटकेस?’ यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. गेल्या काही प्रकरणांमध्ये मुस्लिम मुलांसोबत रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मुलींची हत्या करून त्यांच्या शरीराचे तुकडे फ्रीज आणि सुटकेसमध्ये भरल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यावरूनच साध्वी प्राची यांनी हे ट्विट केलं आहे. मात्र त्यांचं हे ट्विट योग्य नसल्याची प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिली आहे.

‘या खरंच साध्वी आहेत का’, असा सवाल एकाने केला. तर ‘नवविवाहित दाम्पत्याला पाहून इतकी ईर्षा? तुम्ही स्वत:ला साध्वी म्हणवता ना’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. ‘तुमचे संस्कार झळकत आहेत’, अशीही टीका नेटकऱ्यांनी केली.

स्वराने 6 जानेवारी रोजी समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी कोर्ट मॅरेज केलं. जवळपास 40 दिवसांनंतर तिने या लग्नाचा खुलासा केला. मात्र या लग्नावरून अनेकांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. फहाद आणि स्वराच्या आंतरधर्मीय लग्नावर याआधीही साध्वी प्राची यांनी टीका केली होती. “एकतर तिची लवकरच घरवापसी होईल किंवा तिचं श्रद्धा वालकरसारखं होईल. सुटकेस किंवा फ्रिजमध्ये ती सापडेल”, असं त्या म्हणाल्या होत्या.

अयोध्येच्या हनुमानगढी मंदिराचे महंत राजू दास यांनीसुद्धा स्वराच्या लग्नाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “स्वराला भविष्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मी तिला अल्टिमेटम देतो की तिने ज्या जातीत लग्न केलं आहे, त्यात बहिणीसोबतच लग्न केलं जातं. त्यानंतर महिलांना तीन तलाकच्या नावावर अनेक पुरुषांसोबत रात्र घालवावी लागते”, असं महंत राजू दास म्हणाले होते.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.