Saif Ali Khan | ‘तू तुझा ॲटिट्यूड सोडून वाग’, सैफ करीना कपूरला असं का म्हणाला?

करीना कपूर 'जाने जान' या चित्रपटातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. त्यापूर्वी सैफ अली खानने तिला महत्त्वपूर्ण सल्ला दिला होता. तुला तुझा ॲटिट्यूड सोडून काम करावं लागेल, असं सैफने तिला म्हटलं होतं.

Saif Ali Khan | 'तू तुझा ॲटिट्यूड सोडून वाग', सैफ करीना कपूरला असं का म्हणाला?
Saif Ali Khan and Kareena KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 06, 2023 | 11:27 AM

मुंबई | 6 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री करीना कपूर ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘जाने जान’ या चित्रपटाच्या माध्यमातून ती ओटीटी विश्वात पहिलं पाऊल ठेवणार आहे. यासाठी ती फारच उत्सुक आणि त्याचसोबत चिंतीतसुद्धा आहे. “23 वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना मी जितकी नर्व्हस होते, त्यापेक्षा जास्त मी आता आहे,” असं करीना म्हणाली. करीनाने 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेफ्युजी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. इतकंच नव्हे तर करीनाचा पती आणि अभिनेता सैफ अली खान यानेसुद्धा तिला ओटीटीत काम करण्यापूर्वी महत्त्वपूर्ण सल्ला दिला होता. तू तुझा ॲटिट्यूड सोडून वाग, असं थेट सैफने करीनाला म्हटलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द करीनाने याचा खुलासा केला.

सैफ अली खानचा करीनाला सल्ला

करीना म्हणाली, “ओटीटी पदार्पणाविषयी मी खूप नर्व्हस आहे. कारण लोक मला त्यांच्या स्क्रीनवर फार जवळून पाहणार आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रत्येक कलाकार खूप चांगला काम करतोय. त्यामुळे मलासुद्धा मागे नाही राहायचंय.” ‘जाने जान’ या चित्रपटात करीनासोबतच विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव कसा होता याविषयी सांगताना करीना पुढे म्हणाली, “मला शूटिंगदरम्यान जयदीप आणि विजय यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. ते दोघंही पूर्णपणे तयार होते. मला सैफनंही महत्त्वाचा सल्ला दिला होता. या दोघांनाही हलक्यात घेऊ नकोस असं त्याने मला स्पष्टपणे सांगितलं होतं.”

हे सुद्धा वाचा

पहा ट्रेलर

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

“बॅकबेंचरसारखं राहणं बंद कर”

“सैफ मला म्हणाला तू जयदीप अहलावत आणि विजय वर्मा यांच्यासोबत काम करतेय. तुला सर्वोत्तम तयारी करावी लागेल. व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन बसणं, मेकअप करणं आणि सेटवर जाऊन आपले डायलॉग बघणं.. फक्त एवढंच तुझं काम राहत नाही. तुला तुझा ॲटिट्यूड सोडावा लागेल. तुला तुझ्या कामात चोख राहावं लागेल. मी त्याला म्हटलं की मी एखाद्या शाळेतल्या विद्यार्थिनीप्रमाणे राहीन. त्यावर सैफ म्हणाला, शाळेतल्या बॅकबेंचरसारखं राहणं बंद कर. मी सतत त्यांचं काम पाहत आलोय”, असं करीना पुढे म्हणाली.

करीनाचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर विजय मस्करीत म्हणाला, “मला सैफ अली खानचे आभार मानायचे आहेत. कारण जर तो नसता तर आम्हाला आमची किंमत समजली नसती.” जाने जान या चित्रपटाचं दिग्दर्शन सुजॉय घोषने केलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.