Saif Ali Khan Attack : सैफवरील हल्ल्यानंतर तैमूरची नॅनी हादरली, जेहचीही सतावत्ये चिंता, कुटुंबाशी काय झालं बोलणं ?

हल्लेखोर सैफ अली खानच्या घरात कसा पोहोचला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घरात काम करणाऱ्यांचा जबाबा पोलिसांनी नोंदवला असून आता करीना कपूरचा जबाब नोंदवण्यात येऊ शकतो. याचदरम्यान, करीना-सैफ यांची मुलं तैमूर- जेह यांचा आधी सांभाळ करणाऱ्या, Ex-nanny ललिता डिसिल्व्हा यादेखील या घटनेमुळे हादरल्या आहेत.

Saif Ali Khan Attack : सैफवरील हल्ल्यानंतर तैमूरची नॅनी हादरली, जेहचीही सतावत्ये चिंता, कुटुंबाशी काय झालं बोलणं ?
ललिता डिसिल्व्हा यांनी व्यक्त केली चिंता
Follow us
| Updated on: Jan 17, 2025 | 10:22 AM

अभिनेता सैफ अली खान याच्या घरात 15 जानेवारीच्या मध्यरात्री चोर घुसला आणि झटापटीनंतर त्यानै सैफवर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली , सध्या त्याची प्रकृती स्थिर असली तर या घटनेमुळे सैफचे संपूर्ण कुटुंब, करीना, त्याची आई, बहीण प्रचंड दहशतीत आहेत. याप्रकरणामुळे वांद्रे सेफ आहे की नाही, असा सवालही उपस्थित होत असून सुरक्षेबाबबतही नागरिकांना चिंता सतावत आहेय पोलिसांनी या घटनेबाबात सैफच्या घरातील काम करणाऱ्यांचा जबाब नोंदवून घेतला असून हल्लेखोराचा फोटो जारी करून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.

याप्रकरणात आता सैफची पत्नी, अभिनेत्री करीना कपूर खान हिचा जबाब पोलिस नोंदवून घेणार आहेत. आरोपीचा सुगावा अद्याप न लागल्याने आरोपी संदर्भात काही अधिक माहिती मिळते का? यासाठी करीनाचा जबाब महत्त्वाचा आहे, अशी माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. हल्लेखोराशी करीनाचा सामना झाला होता, त्यामुळे याप्रकरणात तिचा जबाब महत्वाचा आहे. ती काय माहिती देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

तैमूर-जेहची माजी नॅनी हादरली

सैफ-करीनाप्रमाणेच त्यांची दोन मुलं तैमूर आणि जहांगीर उर्फ जेह हेही सोशल मीडियावर बरेच लोकप्रिय आहेत, त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सैफवर हल्ला झाला तेव्हा करीना आणि मुलंही घरातच होती. याचदरम्यान तैमूर आणि जेह यांना आधी सांभाळत होत्या, त्या माजी केअरटेक, ललिता डिसिल्व्हा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सैफवर झालेल्या हल्ल्यामुळे ललिता या हादरल्या असून त्यांना तैमूर- जेहची चिंता सतावत आहे.

रिपोर्ट्सनुसार, सैफवर हल्ला करणारी व्यक्ती आधी सैफचा छोटा मुलगा जेहच्या खोलीत लपली होती. हे सर्व ऐकूनच ललिता डिसिल्व्हा काळजीत पडल्या असून त्यांनी एका न्यूज पोर्टलशी बोलताना चिंता व्यक्त केली. ‘ मला अतिशय वाईट वाटतंय. यावेळेस तैमूर आणि जेह यांची परिस्थिती कशी असेल, त्यांना काय वाटत असेल याचा तर मी विचारही करू शकत नाही. जेह तर अतिशय छोटा आहे ‘ असे त्या म्हणाल्या.

कुटुंबाशी काही बोलणं झालं का ?

पुढे ललिता असं म्हणाल्या की ‘ ते ( मुलं) फारच घाबरले असतील. मी जेव्हा या हल्ल्याबद्दल ऐकलं तेव्हा मला अतिशय भीती वाटली. या घटनेतील दोषीला, आरोपीला शिक्षा नक्की मिळेल याचा मला विश्वास आहे. सैफ-करीना किंवा कुटुंबातील इतर कोणाशी माझं आत्तापर्यंत बोलणं तर झालेलं नाही, पण ते आता सुरक्षित असतील’ असा विश्वास ललिता यांनी व्यक्त केला.

करीनाकडून निवेदन जारी

दरम्यान सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर काल रात्री करीना कपूर हिने एक अधिकृत निवेदन जारी केलं. या घटनेनंतर आम्ही अजूनही सावरलेलो नाही, कृपया काहीही स्पेक्युलेशन करु नका, आम्हाला सावरायला वेळ द्या, आम्हाला थोडी स्पेस द्या अशी विनंती तिने मीडिया आणि पापारझींना केली होती.

‘आमच्या कुटुंबासाठी हा एक धक्कादायक आणि चॅलेजिंग दिवस होता. आम्ही अजूनही घडलेल्या घटनेतून‌ सावरण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेला मोठा धोका आहे . त्यामुळे या घटनेचे सातत्याने ‘फॉलोअप आणि कव्हरेज’ टाळा ‘ अशी विनंती करीनाने माध्यमांना केली.

स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी
स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी.
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता...
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता....
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय.
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली.
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?.
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला.
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार.
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही.
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले...
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले....
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी.