Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्यांच्यावर वार झालेत आणि तू…’, सैफवर हल्ला, पण ट्रोल होतेय पलक तिवारी

Saif Ali Khan: अभिनेत्री पलक तिवारी सध्या तुफान ट्रोल होत आहे. सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान याच्यासोबत पलक हिच्या नावाची चर्चा रंगली आहे. सध्या सर्वत्र सैफ याच्यावर झालेल्या हल्ल्याची चर्चा रंगली आहे.

'त्यांच्यावर वार झालेत आणि तू...', सैफवर हल्ला, पण ट्रोल होतेय पलक तिवारी
Follow us
| Updated on: Jan 21, 2025 | 2:46 PM

Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खान याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी तुफान चर्चेत आली आहे. त्यामागे कारण देखील तसंच आहे. अनेकदा पलक हिला सैफ याचा मुलगा इब्राहिम अली खान याच्यासोबत स्पॉट करण्यात आलं आहे. म्हणून इब्राहिम याची कथित गर्लफ्रेंड म्हणून पलक तिवारी हिला अनेकांना ट्रोल केलं आहे.

पलक हिला कायम इब्राहिम याच्यासोबत स्पॉट केलं जाते. मुव्ही डेट, डिनर किंवा फिरायला देखील दोघे एकत्र जातात. पण दोघांनी आतापर्यंत एकत्र एकही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेला नाही. पण दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

दरम्यान, सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पलक देखील गायब आहे. सोशल मीडियावर देखील पलक पूर्वीप्रमाणे सक्रिय नाही. पण 2 दिवसांपूर्वी पलक हिने एक प्रमोशनल व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

पलक हिचा व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी म्हणाला, ‘सासऱ्यांवर वार झाले आहेत आणि तू पोस्ट अपलोड करत आहेस.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘पलक दीदी इब्राहिम कसा आहे?’ तर अनेकांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सैफ अली खान याच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे.

सैफ अली खान याची प्रकृती

सैफ अली खान याला  16 जानेवारी रोजी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर अभिनेत्याला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. पण मात्र, सैफला घरी कधी घेवून जायचं हा निर्णय अभिनेत्याचे कुटुंबिय घेणार आहेत. अभिनेता आता चालू आणि बोलू शकतो. पण त्याला पूर्णपणे  बरं होण्यासाठी आणखी 1 महिना लागणार आहे.

डॉक्टरांनी सैफला पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला असून जड वस्तू उचलणे, व्यायाम करणे आणि शूटिंग करणे टाळन्याचा सल्ला दिला आहे. तर औषधांचे वेळापत्रक लिलावती हॉस्पिटलमध्ये तयार केले जात आहे.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.