AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वत: 1 लाख देणार अन् सैफला म्हणतो 11 लाख दे… रिक्षावाल्याला किती लाखाची मदत करायची?; मिका सिंगच्या सल्ल्याने चर्चा तर होणारच

गायक मिका सिंह हा त्याच्या दानशूरपणासाठी प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध बॉलिवूड गायक मिका सिंग याने बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षाचालकाला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

स्वत: 1 लाख देणार अन् सैफला म्हणतो 11 लाख दे... रिक्षावाल्याला किती लाखाची मदत करायची?; मिका सिंगच्या सल्ल्याने चर्चा तर होणारच
सैफची मदत करणाऱ्या ऑटोचालकाला मिका सिंग देणार बक्षीस
| Updated on: Jan 23, 2025 | 11:24 AM
Share

अभिनेता सैफ अली खान याच्या घरात गेल्या आठवड्यात मध्यरात्री चोर घुसला, त्याला रोखण्याच्या प्रयत्नात झालेल्या झटापटीनंतर चोराने सैफवर हल्ला केला. गंभीर जखमी झालेला, रक्ताने माखलेला सैफ कसाबसा खाली उतरला आणि समोर आलेल्या रिक्षात बसून लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचला. तेथे त्याच्यावर डॉक्टरांनी सर्जरी केली आणि आठवडाभर रुग्णालयात घालवल्यानंतर सैप अखेर सुखरूपपणे घरी पोहोचला. या सगळ्यामध्ये सैफची मदत करणारा , त्याला तातडीने आपल्या  रिक्षातून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारा रिक्षाचालक भजन सिंह राणा हाही खूप चर्चेत आहे. हॉस्पिटलमधून बाहेर पडण्या अगोदर त्याची सैफशी पुन्हा भेट झाली, त्यांच्या भेटीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले.

आता हाच भजनसिंग राणा खूप चर्चेत असून बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मिका सिंग हाही त्याच्यामुळे इंप्रेस झालाय. भजन सिंह याला तो लवकरच मोठं बक्षीस देणार आहे. मिका सिंहने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही घोषणा केली आहे की तो भजन सिंहला 1 लाख रुपयांचे बक्षीस देणार आहे. गेल्या आठवड्यात 16 जानेवारीला पहाटे 2.30 वाजता अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील सतगुरू शरण बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये हल्ला झाला होता. ऑटो रिक्षाचालक भजनसिंग राणा याने रात्री उशिरा त्याला रुग्णालयात नेले आणि त्याच्याकडून पैसेही घेतले नाहीत.

मिकास सिंहने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहीत ही घोषणा केली आहे. त्याला 1 लाख रुपये देणार असल्याचे त्याने घोषित केलं. एवढंच नव्हे तर सैफलाही त्याने त्या रिक्षाचालकाला पैसे देण्याची विनंती केली आहे. सैफ भाई, त्याला प्लीज 11 लाख रुपये दे, तो खरा हिरो आहे, असे मिकाने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याच्या या पोस्टचीच सध्या सर्वत्र चर्चा आहे.

घरी ड्रायव्हर नसल्याने रिक्षात बसून सैफ गेला रुग्णालयात

खरंतर मध्यरात्री सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा त्याच्या घरात एकही ड्रायव्हर नव्हता. यामुळेच त्यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीने रस्त्यावर जाऊन रिक्षा थांबवून चालकाला लीलावती रुग्णालयात जाण्याची विनंती केली. त्यावेळी ऑटो चालवत असलेल्या भजनसिंग राणाने सैफ अली खानला रुग्णालयात नेले. मात्र आप्लाय रिक्षात बसलेला, रक्ताने माखलेला, जखमी इसम हा अभिनेता सैफ अली खान आहे यची त्याला सुतरामही कल्पना नव्हती. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सैफने डॉक्टरांसमोर जेव्हा त्याचे नाव सांगितलं तेव्हा भजन सिंह राणा यांना समजलं की त्यांच्या रिक्षात बसलेला माणूस हा दुसरा-तिसरा कोणीही नाही तर देशातील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान आहे.

डिस्चार्ज मिळाल्यावर घेतली भेट

प्रकृती सुधारल्यानंतर सैफला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जेव्हा सैफ हॉस्पिटलमधून घरी पोहोचला तेव्हा त्याने पापाराझींना पोज दिली आणि हॅलो देखील केलं. मात्र रुग्णालयाच्या बाहेर येण्याआधी स्पेशल रूममध्ये सैफने रिक्षाचालक भजन सिंह राणाची भेट घेतली. सैफनं स्वत: या ऑटोचालकाला भेटायला बोलावलं होतं. त्यांचे फोटोही व्हायरल झाले. सैफने ड्रायव्हरच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्या शेजारी बसून फोटो काढले आहेत. दरम्यान या दोघांमध्ये यावेळी संभाषणही झालं. सैफ आणि त्याच्या कुटुंबियांनी रिक्षाचालकाला काही पैसे दिल्याचे वृत्त आहे, मात्र त्यावर अभिनेता सैफ किंवा रिक्षाचालक राण या दोघांनीही अधिकृतपणे पुष्टी दिलेली नाही.

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.