AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saif Ali Khan : सैफ अली खानचाच चित्रपट त्यात विलनचं नाव ‘तैमूर’, पाकिस्तानात या चित्रपटावर बंदी

Saif Ali Khan : खास बाब म्हणजे काही वर्षांनी सैफ अली खान आणि त्याची पत्नी करीना कपूरने त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं. 2016 साली तैमूरचा जन्म झाला. या नावावरुन सोशल मीडियावर बराच वादविवाद झाला.

Saif Ali Khan : सैफ अली खानचाच चित्रपट त्यात विलनचं नाव 'तैमूर', पाकिस्तानात या चित्रपटावर बंदी
Kareena Kapoor-Saif ali Khan
| Updated on: Mar 23, 2026 | 3:05 PM
Share

सैफ अली खान बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांपैकी एक आहे. त्याने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षाएक सरस सिनेमे दिले आहेत. सैफ अली खान चित्रपटांशिवाय आपल्या कुटुंबामुळे सुद्धा चर्चेत असतो. त्याचा मुलगा तैमूर याची नेहमीच मीडियामध्ये चर्चा असते. आता आम्ही तुम्हाला सैफ अली खानचा एक चित्रपट आणि त्यातल्या विलनबद्दल सांगणार आहोत. 23 मार्च 2012 रोजी सैफ अली खानचा स्पाय थ्रिलर चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला. त्या चित्रपटाचं नाव होतं एजंट विनोद. सैफ अली खानने या चित्रपटात फक्त मुख्य भूमिकाच केली नाही, तर त्याने निर्मिती सुद्धा केली होती. श्रीराम राघवन या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. जेम्स बॉन्ड स्टाइलमध्ये या चित्रपटाची एक्शन-पॅक्ड स्टोरी होती. यात सैफ एजंट विनोदच्या रोलमध्ये दिसला. करीना कपूरने त्याच्या सोबत परवीन बिल्ललचा रोल प्ले केलेला. चित्रपटात ग्लोबल कॉन्सपिरेसी, हाय-वोल्टेज एक्शन सीक्वेंस आणि स्टायलिश लोकेशन्स भरपूर होते.

पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटावर बंदी घातली होती. कारण या चित्रपटाच्या कथेमध्ये पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI चा उल्लेख होता. काही सीन्समध्ये पाकिस्तानला नकारात्मक पद्धतीने दाखवण्यात आलेलं. सैफ अली खान त्यावेळी बोललेला की, हा चित्रपट कुठल्या देशाच्या विरोधात नाही. एक फिक्शनल स्पाय थ्रिलर आहे. पण पाकिस्तानात हा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला नाही.

ऐतिहासिक तैमूर लंगला लोक क्रूर विजेता मानतात

या चित्रपटात विलनच नावं तैमूर होतं. गुलशन ग्रोवरने हा रोल प्ले केलेला. एक खतरनाक इंटरनॅशनल गुन्हेगाराच्या रुपात गुलशन ग्रोवरला दाखवलं होतं. खास बाब म्हणजे काही वर्षांनी सैफ अली खान आणि त्याची पत्नी करीना कपूरने त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं. 2016 साली तैमूरचा जन्म झाला. या नावावरुन सोशल मीडियावर बराच वादविवाद झाला. सैफ आणि करीनाला मुलाचं नाव तैमूर ठेवलं म्हणून लोक आजही ट्रोल करतात. ऐतिहासिक तैमूर लंगला लोक क्रूर विजेता मानतात. एजेंट विनोदला मिक्स्ड रिव्यूज मिळाले होते. एक्शन आणि विजुअल्सच कौतुक झालेलं. पण स्क्रिप्टवर काही प्रश्न उपस्थित झालेले. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सरासरीच ठरला.

Follow Us
आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो
मोठी बातमी! आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो क्लीपने खळबळ
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... ठाकरेंच्या वकिलांच्या दाव्याने..
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... वकिलांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही...
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही... शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने खळबळ
आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा
मोठी बातमी! आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा, मात्र शिवसेना कुणाची? ह्यावर सस्पेन्स कायम
अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
Shivsena SC Hearing | सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा मोठा दावा! अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... डार्क वेबचा वापर करून कट?
Nagpur | मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेकाचं भयनाक कृत्य
विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; कोर्टात सिब्बल यांचा युक्तिवाद
Shivsena Symbol Hearing Update | विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा सडेतोड युक्तिवाद
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाने डाव पलटणार?
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीत
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीती