सलमान खानचा मुंबई रेल्वे स्थानकावर जलवा, भाईजानची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी
Salman Khan: मुंबई रेल्वे स्थानकावर सलमान खानची एन्ट्री, रेल्वे स्थानकावर भाईजानची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी... सध्या सोशल मीडियावर सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खानच्या व्हिडीओची चर्चा

Salman Khan: सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओची चर्चा तुफान रंगली आहे. व्हिडीओ अभिनेता सलमान खान याचा असल्यामुळे तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सलमान त्याच्या बॉडीगार्ड्ससोबत मुंबईच्या रेल्वे स्थानकावर फिरत असल्याचं चित्र दिसत आहे. प्रचंड गर्दी असलेल्या रेल्वे स्थनकावर सलमान आल्यामुळे अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान आगामी ‘सिकंदर’ सिनेमाच्या शुटिंगसाठी मुंबई रेल्वे स्थानकावर आला. व्हिडीओमध्ये पोलिसांसोबतच तेथे मोठा जमाव जमला असून त्यांच्या समोरून सलमान जात असल्याचं दिसत आहे. आशात प्रत्येकाची नजर अभिनेत्याकडे येऊन थांबली. हा व्हिडीओ सलमानच्या ‘सिकंदर’ सिनेमातील एका सीनच्या शूट दरम्यानचा आहे, जिथे त्याच्याभोवती गर्दी जमली होती.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना एका चाहत्याने लिहिलं आहे की, ‘एआर मुरुगदास आम्हाला 1000 कोटी रुपयांचा सिनेमा देणार आहेत.’ सलमानला पाहून लोकांचा उत्साह शिगेला पोहोचला आणि त्यांनी आरडाओरडा सुरू केला. सध्या व्हिडीओ तुफान चर्चेत आहे.
सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर. दिग्दर्शक एआर मुरुगदॉस दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला निर्मित ‘सिंकदर’ सिनेमा खास असणार आहे. सिनेमात अभिनेत्री काजल अग्रवाल, रश्मिका मंदाना, सत्यराज, शरमन जोशी आणि प्रतीक बब्बर मुख्य भूमिकेत आहे. सिनेमा 28 मार्च 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
सलमान खान याची सुरक्षा
सतत येत असलेल्या धमक्यांमुळे सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. 14 एप्रिल रोजी सलमान खान याच्या वांद्रे येथील राहत्या स्थळी घराबाहेर गोळीबार झाल्यामुळे अभिनेत्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. स्वतःच्या सुरक्षेसाठी अभिनेत्याने बुलेट प्रुफ कार देखील खरेदी केली आहे.
एवढंच नाही तर, ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान याला देखील धमकी देण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान हिटलिस्ट होता. या घटनेची जबाबदार गुंड लॉरेन्स बिष्णोई याने सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतली.
