Salman Khan | अखेर सलमानच्या मिस्ट्री गर्लचा चेहरा समोर; फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

सलमान खानच्या फोटोतील ती मिस्ट्री गर्ल नेमकी आहे तरी कोण, असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यावरून आता खुद्द सलमाननेच पडदा उचलला आहे. सोमवारी बॉलिवूडच्या 'दबंग' खानने त्या मुलीसोबतचे आणखी दोन फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

Salman Khan | अखेर सलमानच्या मिस्ट्री गर्लचा चेहरा समोर; फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
Salman KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 09, 2023 | 3:22 PM

मुंबई | 9 ऑक्टोबर 2023 : अभिनेता सलमान खानने रविवारी 8 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. सलमानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका मुलीसोबतचा फोटो पोस्ट केला होता. मात्र या फोटोमध्ये ती मुलगी नेमकी कोण आहे हे कळू शकलं नव्हतं. सलमानसोबत फोटोमध्ये पाठमोरी उभी असलेली मिस्ट्री गर्ल नेमकी आहे तरी कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. सलमानने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, ‘मी नेहमीच तुझ्यासोबत उभा राहीन.’ बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमानची ही जोडीदार तर नाही ना, असाही प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर आता खुद्द सलमाननेच मिस्ट्री गर्लच्या चेहऱ्यावरून पडदा उचलला आहे.

सोमवारी सलमानने इंस्टाग्रामवर तिच्यासोबतचा आणखी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमुळे सलमानसोबत ती मिस्ट्री गर्ल नेमकी कोण होती, हे समजलं. ती मुलगी दुसरी-तिसरी कोणी नसून सलमानची भाची अलिझे अग्निहोत्री आहे. अलिझे सलमानची बहीण अलविरा खान आणि मेहुणा अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे. सलमानसोबत मिळून तिने नुकतंच एका कपड्यांच्या ब्रँडसाठी फोटोशूट केलं आहे. याशिवाय अलिझे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

हे सुद्धा वाचा

सलमानच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, त्याचा बहुप्रतिक्षित ‘टायगर 3’ हा चित्रपट येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत कतरीना कैफची मुख्य भूमिका आहे. याशिवाय शाहरुख खान यामध्ये पाहुणा कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. ‘टायगर 3’मध्ये सलमान आणि कतरिनाचा ॲक्शन अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ‘टायगर 3’ फ्रॅंचाइजीमधील आधीचे दोन चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर तुफान हिट झाले होते.

याशिवाय शाहरुख खान आणि सलमान खान ही सुपरहिट जोडी एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘टायगर वर्सेस पठाण’ या चित्रपटात किंग खान आणि बॉलिवूडचा भाईजान हे एकमेकांसमोर येणार आहेत. मार्च 2024 मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल. ‘टायगर वर्सेस पठाण’ या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा करणार आहे. शाहरुख आणि सलमान यांना वेगवेगळ्या मीटिंगमध्ये बोलावून त्यांना कथा ऐकवण्यात आली होती. त्यानंतर दोघांनीही एकत्र काम करण्यास होकार दिला आहे.

बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट
बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट.
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य.
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ.
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले...
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले....
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय.
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख.
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ.
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा.
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ.
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात..
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात...