AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानचा मोठा निर्णय, अचानक मुंबईतील घर विकलं, इतक्या कोटींमध्ये झाला सौदा

सलमान खानने अचानक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने मुंबईतील त्याचं घर अचानक विकलं आहे. इतक्या कोटींमध्ये सौदा झाल्याची माहिती समोर आलं आहे. अचानक त्याने असा का निर्णय का घेतला?

सलमान खानचा मोठा निर्णय, अचानक मुंबईतील घर विकलं, इतक्या कोटींमध्ये झाला सौदा
Salman Khan Sells Mumbai ApartmentImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 16, 2025 | 7:41 PM
Share

सलमान खान सध्या त्याच्या पुढच्या चित्रपट ‘बॅटल ऑफ गलवान’ मध्ये व्यस्त आहे. सिकंदर नंतर, सलमान त्याच्या पुढच्या चित्रपटात कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. एकीकडे, सलमान ‘बॅटल ऑफ गलवान’ च्या तयारीसाठी चर्चेत असताना, दुसरीकडे, आता सलमानने मुंबईतील त्याचे अपार्टमेंट कोट्यवधी रुपयांना विकल्याचं समोर आलं आहे. सलमान खानने अचानक हा निर्णय घेतल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे.

सलमानने हे अपार्टमेंट किती कोटी रुपयांना विकला

सलमानने विकलेले अपार्टमेंट बांद्र पश्चिम येथे होते. हे अपार्टमेंट बांद्रा परिसरातील पाली व्हिलेजमधील शिवस्थान हाइट्समध्ये होतं. हे एक प्रीमियम रेजिडेंशियल कॉम्प्लेक्स आहे. सलमानने हे अपार्टमेंट 5.35 कोटी रुपयांना विकला आहे. घर नोंदणीचे कागदपत्र तपासणी केल्यानंतर स्क्वायर यार्ड्सने याचा खुलासा केला आहे. हा करार या महिन्यात म्हणजेच जुलै 2025 मध्येच झाला आहे.

अपार्टमेंट किती मोठे होते?

सलमान खानचा हा फ्लॅट फार मोठा नव्हता. फ्लॅट 122.45 चौरस मीटर म्हणजेच 1218 चौरस फूट आहे. या फ्लॅटमध्ये तीन कार पार्किंगची सुविधा देखील आहे. या डीलसाठी 32.01 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली आहे. याशिवाय 30 हजार रुपयांची नोंदणी फी देखील भरण्यात आली आहे. सलमानने विकलेला फ्लॅट त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटपासून सुमारे 2.2 किलोमीटर अंतरावर आहे. सलमान अजूनही त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये त्याच्या कुटुंबासह राहत आहे.

मुंबईतील मालमत्तेच्या बाबतीत बांद्रा हे एक प्रमुख ठिकाण मानलं जातं. शाहरुख खान, आमिर खान, करीना कपूर खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि जावेद अख्तर यांच्यासह अनेक स्टार्सची घरे या भागात आहेत. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण देखील लवकरच या भागात स्थलांतरित होणार आहेत.

सिकंदरनंतर ‘गॅलवान’ मध्ये दिसणार सलमान

टायगर 3 नंतर, सलमान खान या वर्षी सिकंदर चित्रपटात दिसला. सिकंदर फार चालला नाही. आता सलमान त्याच्या पुढच्या चित्रपटावर लक्ष केंद्रित करत आहे. या चित्रपटाचे नाव आहे बॅटल ऑफ गलवान, ज्यामध्ये सलमान एका सैनिकाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत आहेत.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.