सलमान त्याच्या सवयीमुळे मुलींपासून…, अनेक वर्षांनंतर भाग्यश्रीकडून मोठा खुलासा
Salman Khan: सलमान खानच्या खासगी आयुष्याबद्दल भाग्यश्रीकडून मोठा खुलासा, म्हणाली, 'सलमान त्याच्या सवयीमुळे मुलींपासून...', भाईजान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतो चर्चेत

Salman Khan: अभिनेता सलमान खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. अभिनेत्याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. पैसा, प्रसिद्ध असं काही नाही जे सलमान खान याच्याकडे नाही. तरी देखील तो वयाच्या 60 व्या वर्षी एकटंच आयुष्य जगत आहे. अनेक अभिनेत्रींसोबत सलमान याचं नाव जोडण्यात आलं पण नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. दरम्यान अभिनेत्री भाग्यश्री हिने सलमान खान याच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
भाग्यश्री आणि सलमान यांनी ‘मैंने प्यार किया’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. सिनेमातील दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने मोठी मजल मारली. दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत भग्यश्रीने मोठा खुलासा केला आहे. ‘मी किती वाईट पुरुष आहे…’ हे सांगण्याचा अभिनेत्याने अनेकदा प्रयत्न केला. भाग्यश्री सलमान खानच्या खासगी आयुष्याबद्दल म्हणाली, ‘सलमान खान कधीच कोणत्या मुलीच्या मागे गेला नाही. मुली त्याच्या मागे होत्या… सलमान कायम म्हणायचा, चांगल्या मुलींनी माझ्यावर प्रेम करावं… अशी माझी बिलकून इच्छा नाही… सलमान स्वतःला कधीच चांगला मुलगा मानत नव्हता…’
सलमान, भाग्यश्री हिला असं देखील म्हणाला होता की, ‘एका मुलीसोबत जास्त काळ राहिल्यानंतर मला बोर होतं. त्यामुळे जेव्हापर्यंत माझी सवय सुधारत नाही… मी कोणत्याच मुलीला माझ्या जवळ येऊ देणार नाही… सलमान खान त्याच्या सवयींमुळे कधीच कोणत्या मुलीला जवळ येऊ देत नव्हता… मुलींपासून तो कायम लांब रहायचा…’ असं देखील भाग्यश्री म्हणाली.
सलमान खान याच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्यासोबत सलमान रिलेशनशिपमध्ये होता. अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. अखेर नातं लग्नापर्यंत पोहोचलं. सलमान आणि संगीता यांच्या लग्नाच्या पत्रिका देखील छापून झाल्या होत्या. पण काही कारणामुळे दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. पण आजही सलमान आणि संगीता चांगले मित्र आहेत.
भाग्यश्री हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना भाग्यश्री हिने 1989 मध्ये उद्योजक हिमालय दसानी यांच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर अभिनेत्री बॉलिवूडचा निरोप घेतला. भाग्यश्री हिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आज अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे.
