AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिच्यापासून 10 पावलं लांब राहा..; कोणासाठी पापाराझींवर भडकला सलमान?

अभिनेता सलमान खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो पापाराझींना इशारा देताना दिसतोय. सलमानच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

तिच्यापासून 10 पावलं लांब राहा..; कोणासाठी पापाराझींवर भडकला सलमान?
Salman KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 12, 2025 | 9:08 AM
Share

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खान त्याच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो. चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारणारा सलमान खऱ्या आयुष्यात मात्र ‘फॅमिली मॅन’ म्हणजेच कौटुंबिक व्यक्ती आहे. आई, बाबा, भाऊ, बहीण, भाऊ-बहिणींची मुलं.. या सर्वांना तो खूप जपतो. त्यांच्या सुखदु:खाच्या काळात पाठिशी खंबीरपणे उभा राहतो. त्याचवेळी भाऊबहिणींच्या मुलांसोबत त्याचं एक अनोखं नातं पहायला मिळतं. आपल्या कुटुंबीयांप्रती सलमान किती सजग आहे, याचं उदाहरण नुकतंच एका कार्यक्रमात पहायला मिळालं. या कार्यक्रमात सलमानसोबत त्याची भाची आयतसुद्धा होती. आयत ही सलमानची बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांची मुलगी आहे.

सोमवारी रात्री सलमान मुंबईतील एका कार्यक्रमात त्याच्या भाचीसोबत पोहोचला होता. चिमुकल्या आयतचा हात हातात घेऊन सलमान चालत होता आणि त्याच्याभोवती सुरक्षारक्षक, पापाराझींचा घोळका होता. लोकांचा गराडा पाहून सलमानने त्याच्या भाचीला कडेवर उचलून घेतलं आणि पापाराझींना तिच्यापासून दहा पावलं लांब राहण्याचा इशारा दिला. सलमान आणि आयतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडीओमध्ये चिमुकली आयत सलमानच्या कडेवर दिसली. थोडं चालल्यानंतर सलमान तिला खाली उतरवून तिचा हात पकडून चालू लागतो.

पापाराझींच्या गर्दीत सलमान त्याच्या भाचीची काळजी घेताना दिसला. त्यानंतर त्याच्याच अंदाजात तो पापाराझींना म्हणाला, “चला.. चला मागे.. दहा पावलं लांब.. छोटी मुलगी सोबत आहे, पुढे चालत राहा.” याच व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. अर्पिताने 2019 मध्ये अयातला जन्म दिला. विशेष म्हणजे अयातचा जन्म हा सलमानच्या वाढदिवशीच झाला.

सलमान खानच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, तो लवकरच ‘बॅटल ऑफ गलवान’मध्ये झळकणार आहे. अपूर्व लाखिया या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचं शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. त्याचा ‘सिकंदर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष गाजला नाही. यामध्ये त्याच्यासोबत रश्मिका मंदानाची मुख्य भूमिका होती.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.