AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan : सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये मोठी खळबळ, घराजवळ सापडला मोठा साप

अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये नुकताच एक धामण जातीचा साप आढळून आला, ज्यामुळे परिसरात तात्पुरती खळबळ उडाली. सर्पमित्रांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन ५ फूट लांबीच्या या सापाला सुरक्षितपणे पकडले. त्याला कोणतीही इजा न होता नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले. या घटनेची नोंद पोलिसांतही करण्यात आली.

Salman Khan : सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये मोठी खळबळ, घराजवळ सापडला मोठा साप
सलमान खान
| Updated on: May 19, 2026 | 8:14 AM
Share

अबिनेता सलमान खान नेहमीच चर्चेत असतो. अवघ्या कही दिवसांपूर्वीच त्याने इन्स्टाग्रामवर शर्टलेस फोटो टाकला होता, ज्यावर असंख्य लाइक्स आणि कमेंट्स आल्या. यामध्ये त्याने एकटेपणाबद्दलही पोस्ट केली होती. त्यानंतर आता सलमान पुन्हा चर्चेत आला. खरंतर सोमवारी सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये एक साप सापडल्याने मोठी खळबळ माजली. त्याच्या घराजवळ हा धामण जातीचा सर्प सापडला आणि गोंधळ उडाला. मात्र सर्पमित्रांनी लागलीच तिथे धाव घेतली आणित्या सर्पाला पकडल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला. सर्पमित्राने साप पकडल्याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

घराजवळ सापडला साप

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास धामण जातीचा साप हा सलमान खानच्या गॅलेक्सी निवासस्थान परिसरात आढळून आला. गॅलॅक्सी येथे ड्युटीवर असणाऱ्या पोलिस कान्स्टेबल मनोज कट्टे यांना ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी लगेच सर्पमित्र विक्की दुबे यांना याबाबत माहिती दिली. सापाबद्दल कळताच सर्प मित्र विक्की दुबे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा हा धामण जातीचा साप गाडी पार्किंगच्या ठिकाणी शटरच्या आत गेल्याचे आढळून आलं. मिळालेल्या माहितीनुसार, सदर साप हा धामण जातीचा असून तो 5 फूट लांबीचा पण बिनबिषारी होता.

अखेर सर्पमित्र दुबे यांनी सुरक्षितरित्या सापाला पकडलं , त्याला कोतीही इजा होणार नाही याचीही कालजी घेतली. त्यानंतर त्या सापाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आलं. या घटनेबाबात बांद्रा पश्चिम पोलीस स्थानकात रीतसर डायरी बनवून नोंद करण्यात आली . तसेच वनविभाग कंट्रोल रूमला देखील माहिती देण्यात आली.

मोठ्या पडद्यावर कधी दिसणार सलमान खान ?

कामाबद्दल बोलायचं झालं तर 2025 साली प्रदर्शित झालेल्या ‘सिकंदर’ या चित्रपटात सलमान खान दिसला होता, पण हाँ चित्रपट फार चालला नाही. या वर्षी, सलमानने रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या मराठी-हिंदी चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली. तो लवकरच ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्यात चित्रांगदा सिंग देखील आहे. हा चित्रपट ऑगस्ट महिन्यात रोजी रिलीज होणार आहे.

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.