AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या घरातील चड्डी बनियान आणि पैशाची बॅग… महिला नेत्याने संजय शिरसाट यांना फटकारलं; राऊत प्रकरणावरून घमासान

आयोध्या पौळ यांनी संजय शिरसाठ यांच्यावर तिखट शब्दांत हल्ला चढवला असून, त्यांच्या वैयक्तिक जीवनातील मुद्द्यांना बाहेर काढत ‘तुमच्या घरातील चड्डी-बनियान आणि पैशाची बॅग...’ अशा शब्दांत फटकारले आहे.

तुमच्या घरातील चड्डी बनियान आणि पैशाची बॅग... महिला नेत्याने संजय शिरसाट यांना फटकारलं; राऊत प्रकरणावरून घमासान
Sanjay Sirsat and Vinayak RautImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 13, 2026 | 3:14 PM
Share

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी विनायक राऊत यांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला नेत्याने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आयोध्या पौळ यांनी संजय शिरसाठ यांच्यावर तिखट शब्दांत हल्ला चढवला असून, त्यांच्या वैयक्तिक जीवनातील मुद्द्यांना बाहेर काढत ‘तुमच्या घरातील चड्डी-बनियान आणि पैशाची बॅग…’ अशा शब्दांत फटकारले आहे.

काय म्हणाल्या?

आयोध्या पौळ यांनी संजय शिरसाठ यांना थेट इशारा करत म्हटले, “तुमच्या घरातील चड्डी बनियान आणि पैशाची बॅग घेऊन असलेला व्हिडिओ तुमच्याच घरातील एका व्यक्तीने मला पाठवला होता. तुमच्या घरातील लेकराचे प्रेम प्रकरण तुम्ही कशा पद्धतीने हाताळलं, हे मला महाराष्ट्रात सांगायला भाग पाडू नका.”

पौळ यांनी पुढे म्हटले की, “संजय शिरसाठ, तुम्हाला पत्रकारांनी विनायक राऊत यांच्याबद्दल प्रश्न विचारले असताना तुम्ही त्याचे उत्तर देण्याऐवजी मातोश्रीवर बोललात. मातोश्री आणि विनायक राऊत यांच्या घरात काय चाललंय याकडे बघण्यापेक्षा स्वतःच्या घरात लक्ष दिले असते तर बरं झालं असतं. काही दिवसांपूर्वी तुमच्या सुनबाई पोलीस स्टेशनला गेल्या होत्या आणि मीडियासमोर आल्या होत्या, हे तुम्ही विसरलात का?”

महिला नेत्याने शिरसाठ यांना सल्लाही दिला की, “मातोश्री आणि विनायक राऊत यांच्यावर बोलण्यापेक्षा तुमच्या घरात काय सुरू आहे ते बघा! तुमच्या घरातला तमाशा तुम्ही स्वतः निस्तारायला पाहिजे. मातोश्रीवर बोलताना तोंड सांभाळून आणि मर्यादित राहून बोला.”

विनायक राऊत प्रकरण काय?

माजी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गितेश राऊत यांच्या पत्नी गिरिजा यांनी ठाण्यात पतीविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामध्ये त्यांनी पती आणि सासूबाईंनी छळ केल्याचे म्हटले.

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश