AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खान सोबत कोण पंगा…, ऐश्वर्या रायच्या एक्स-बॉयफ्रेंडचं नाव घेताच भाईजानची प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल

Salman Khan | ऐश्वर्या राय हिच्यावर होत सलमान खान याचं जीवापाड प्रेम... तिच्या एक्स-बॉयफ्रेंडबचं नाव घेताच अभिनेत्याने असं काय केलं? व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून म्हणाल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याची चर्चा...

सलमान खान सोबत कोण पंगा..., ऐश्वर्या रायच्या एक्स-बॉयफ्रेंडचं नाव घेताच भाईजानची प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Apr 16, 2024 | 8:20 AM
Share

अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय याच्या नात्याचा चॅप्टर आज प्रत्येकाला माहिती आहे. दोघांच्या ब्रेकअपला अनेक वर्ष झाली आहेत. पण तरी देखील चाहत्यांमध्ये दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगलेल्या असतात. आता देखील सोशल मीडियावर सलमान खान याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय हिच्या एक्स-बॉयफ्रेंडचं नाव घेताच, सलमान खान याने दिलेली प्रतिक्रिया सध्या तुफान चर्चेत आहे. सांगायच झालं तर, सलमान खान याचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ जुना आहे, पण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की सलमान खान कोणत्या तरी सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला असावा. व्हिडीओमध्ये महिला भाईजानला म्हणाल्या, ‘तू विवेक ओबेरॉय याला कधीच माफ करणार नाही बरोबर…’ यावर सलमान म्हणतो, ‘कोण विवेक ओबेरॉय?’

सलमान खान याने विवेक याला ओळखण्यास नकार दिल्यानंतर, महिला पुन्हा म्हणाल्या, ‘तुला विवेक तुझ्या आयुष्यात नकोच नाही, त्याच्यासोबत तुझे काहीही संबंध नाहीत?’ यावर सलमान म्हणतो, ‘कोण विवेक मी ओळखत नाही…’ भाईजानच्या प्रतिक्रियेनंतर सर्वत्र अभिनेत्याची चर्चा रंगली आहे.

सलमान खान याच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘सलमान खान याच्यासोबत कोण पंगा घेईल…’, तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सलमान खान बेस्ट अभिनेता आहे..’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याची चर्चा रंगली आहे.

सलमान खान आणि ऐश्वर्या राय

एक काळ असा होता जेव्हा फक्त बॉलिवूडमध्येच नाहीतर, चाहत्यांमध्ये देखील सलमान – ऐश्वर्या यांच्या नात्याच्या चर्चा रंगलेल्या होत्या. दोघे देखील एकमेकांवर प्रचंड प्रेम करत होते. पण दोघांचं नातं कधीच लग्नापर्यंत पोहोचलं नाही. सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर, ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. ऐश्वर्या – अभिषेक यांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव आराध्या बच्चन असं आहे.

तर सलमान खान वयाच्या 58 व्या वर्षी देखील एकटाच आहे. सलमान खान बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना डेट केलं आहे. अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्यापासून अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यापर्यंत सलमान याने अभिनेत्रींना डेट केलं आहे. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत सलमान याचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. सलमान खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो.

Follow Us
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार