AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samantha Ruth Prabhu | घटस्फोटानंतर समंथा हिच्या आयुष्यात नव्या व्यक्तीची एन्ट्री? फोटो पाहून तुम्हीही म्हणाल…

नागा चैतन्य याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर पूर्णपणे खचली होती समंथा... पण आता अभिनेत्रीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिच्या खांद्यावर हात कोणाचा? फोटो पाहून तुम्हीही म्हणाल...

Samantha Ruth Prabhu | घटस्फोटानंतर समंथा हिच्या आयुष्यात नव्या व्यक्तीची एन्ट्री? फोटो पाहून तुम्हीही म्हणाल...
| Updated on: Jul 26, 2023 | 12:03 PM
Share

मुंबई | 26 जुलै 2023 : झगमगत्या विश्वात आधी सेलिब्रिटींची मैत्री होते. मैत्रीचं रुपांतर प्रेमात होतं. त्यांनतर दोघांचं नातं लग्नापर्यंत येवून पोहोचतं. अखेर कुटुंबियांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात लग्न देखील पार पडतं. पण लग्नाच्या काही वर्षांनी मात्र नात्याचा शेवट प्रचंड वाईट होतो. असंच काही झालं आहे. अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) यांच्यासोबत. जेव्हा नागा चौतन्य आणि समंथा प्रभू यांनी घटस्फोटाची घोषणा केली, तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला. लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर अभिनेत्रीने करियरकडे लक्ष केंद्रीक करण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रकृतीच्या काही कारणांमुळे समंथा हिने काही काळ ब्रेक घेतला आहे.

सध्या समंथा स्वतःसाठी जगत आहे. अभिनेत्रीने अभिनयातून अभिनेत्रीने ब्रेक घेतला असला तरी, सोशल मीडियावर मात्र अभिनेत्री सक्रिय कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्री फिरायला गेली आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर अनेक फोटो पोस्ट केले आहेत. पण सोशल मीडियावरील एका फोटोमुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे.

समंथाने एका फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये समंथा निसर्गाच्या सानिध्यात बसली आहे आणि अभिनेत्रीच्या खांद्यावर कोणाचा तरी हात असल्याचं दिसून येत आहे. पण शेजारी बसलेल्या व्यक्तीबद्दल अभिनेत्री काहीही सांगितलं नाही. त्यामुळे घटस्फोटानंतर अभिनेत्रीला सावरण्यासाठी तिच्यासोबत कोण आहे अद्याप कळू शकलेलं नाही.

अभिनेता नागा चैतन्य याच्यासोबत विभक्त झाल्यानंतर अभिनेत्री पूर्णपणे खचली होती. पण अभिनेत्रीच्या कठीण काळात तिच्यासोबत कुटुंब आणि मित्र होते. नागा चैतन्य याच्यासोबत असलेल्या नात्यावर समंथा हिने अनेकदा सांगितलं.. एवढंच नाही तर, नातं टिकवण्यासाठी १०० टक्के प्रयत्न केला. पण योजनेनुसार काहीही झालं नाही…’ असं देखील अभिनेत्री एका मुलाखतीत म्हणाली होती.

दरम्यान, ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये करण याने समंथाला ‘तुझ्या मनापर्यंत जाण्याच मार्ग कोणता?’ यावर अभिनेत्री म्हणाली होती, ‘माझ्या मनापर्यंत पोहोचणारे सर्व मार्ग आता बंद झाले आहेत…’ असं उत्तर दिल्यानंतर देखील अभिनेत्री तुफान चर्चेत आली होती.

नागा चैतन्य आणि समंथा यांची पहिली ओळख २०१० साली ‘माया चेसावे’ सिनेमाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी २०१७ मध्ये मोठ्या थाटात लग्न केलं. नागा चैतन्य आणि समंथा यांनी लग्नासाठी तब्बल १० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला. पण दोघांचं नातं फक्त चार वर्ष टिकलं.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.