AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समांथा मिस्ट्री बॉयसोबत पोहोचली तिरुपती बालाजी मंदिरात, कोण आहे तो?

शनिवारी समांथाने तिरुपती बालाजी मंदिराला भेट दिली. तिचे तेथील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये समांथासोबत मिस्ट्री बॉय दिसत आहे. आता ही व्यक्ती नेमकी कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

समांथा मिस्ट्री बॉयसोबत पोहोचली तिरुपती बालाजी मंदिरात, कोण आहे तो?
SamanthaImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 20, 2025 | 12:14 AM
Share

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा रूथ प्रभू नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनयाव्यतिरिक्त, ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही लोकांचे लक्ष वेधून घेते. काही दिवसांपूर्वी समांथाच्या पूर्व पती अभिनेता नागाचैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी लग्न केले. आता समांथा तिच्या लव्ह अफेअरमुळे ती चर्चेत आली आहे. समांथा कोणाला तरी डेट करत असल्याचे म्हटले आहे. आता हा मिस्ट्रीबॉय समांथासोबत तिरुपती बालाजी मंदिरात गेली होती. तेथील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता हा मिस्ट्री बॉय कोण आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, समांथाने शनिवारी (१९ एप्रिल) तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला. त्यावेळी समांथासोबत चित्रपट निर्माते राज निदिमोरू देखील होते. त्यांच्या भेटीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडीओमध्ये दोघेही मंदिर परिसरात पारंपारिक पोशाखात दिसत आहेत. १९ एप्रिल रोजी, ‘कुशी’ अभिनेत्री राज निदिमोरूसोबत पारंपारिक पोशाखात दिसली आणि तो क्षण पापाराझींनी शेअर केला आहे. एका क्लिपमध्ये, दोघे एकत्र मंदिरात प्रवेश करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये समांथा कोणाची तरी वाट पाहत असल्याचे दिसत आहे. एका वेगळ्या व्हिडीओमध्ये, समांथा इतर अनेकांसह मंदिरात प्रवेश करताना दाखवण्यात आली आहे. वाचा: लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली पत्नी कोण होती? दागिन्यांसह दिला होता अग्नी

समांथा किंवा राज निदिमोरू यांनी त्यांच्या डेटिंगच्या अफवांबद्दल कोणतेही अधिकृत विधान केलेले नसले तरी, त्यांचे चाहते बऱ्याच काळापासून अंदाज लावत आहेत. समांथा रूथ प्रभू आणि राज निदिमोरू यांच्यात गेल्या काही काळापासून डेटिंगच्या अफवा पसरत आहेत, परंतु दोघांपैकी कोणीही या अफवांना दुजोरा दिलेला नाही. त्यांच्या नात्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. समांथा अनेकदा मंदिरात जाऊन आर्शीवाद घेताना दिसते.

या अभिनेत्रीने दिग्दर्शकासोबत ‘सिटाडेल: हनी बनी’ (२०२४) आणि ‘द फॅमिली मॅन २’ (२०२१) या दोन प्रकल्पांवर आधीच काम केले आहे. ‘रॅक्ट युनिव्हर्स: द ब्लडी किंगडम’ नावाची त्यांची पुढील नेटफ्लिक्स मालिका देखील दिग्दर्शकाकडे आहे. समांथा शेवटची सिटाडेल: हनी बनीमध्ये दिसली होती, ज्यामध्ये वरुण धवनची सह-अभिनय होती.

Follow Us
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन, पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह
बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, पण... राम कदमांची टीका
Video : बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, त्यांच्यानंतर मात्र..., राम कदमांची ठाकरे बंधूंवर टीका
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट..
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट...