सेम ड्रेस, फिलिंगही सेम, राजकुमार पत्रलेखाचं अनोखं प्रेम, गुडघ्यावर बसून प्रपोज, पाहा रोमँटिक Video

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये राजकुमार राव गुडघ्यावर बसून पत्रलेखाला प्रपोज करताना दिसत आहे. तिने केलेले प्रपोज पाहून पत्रलेखा तिच्या जवळ जाऊन बसते. आणि त्याने दिलेली अंगठी स्वीकारतो.

सेम ड्रेस, फिलिंगही सेम, राजकुमार पत्रलेखाचं अनोखं प्रेम, गुडघ्यावर बसून प्रपोज, पाहा रोमँटिक Video
rajkummar

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नाच्या बातम्या येत होत्या. या सर्व बातम्या रिपोर्ट्सच्या मध्यमातून येत होत्या पण आता हे दोन्ही लग्नगाठ बांधत असल्याची पुष्टी झाली आहे. या दोघांचे प्री-वेडिंगचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

राजकुमारने पत्रलेखाला निजवर बसून केले प्रपोज
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल भय्यानी नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये राजकुमार राव गुडघ्यावर बसून पत्रलेखाला प्रपोज करताना दिसत आहे. त्याची स्टाईल पाहून पत्रलेखा त्याच्या जवळ बसते आणि त्याने दिलेली अंगठी स्वीकारते. दोघे खूप हसतात. यानंतर राजकुमार पत्रलेखासोबत रोमँटिक डान्स करतो. या लवबर्डचे प्रेम पाहून तेथे असणाऱ्या प्रत्येकाच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सेलिब्रिटींची बाहुगर्दी
या खास दिवशीपत्रलेखाने पांढऱ्या रंगाचा लेहेंगा तर राजकुमार रावने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केलेली पाहायला मिळत आहे. या सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी फराह खान, साकिब सलीम आणि हुमा कुरेशी सारखे सेलिब्रिटीही पाहायला मिळत आहेत. या सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दोघेही पाहुण्यांसोबत दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

कधी अडकणार लग्नबंधनात
राजकुमार आणि पत्रलेखा आज १४ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांचा विवाह सोहळा सुरू झाला आहे. मेहंदी सेरेमनीमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक कलाकार पोहोचले आहेत. राजकुमार राव आणि पत्रलेखा अनेक वर्षांपासून एकमेकांच्या नात्यात आहेत. सिटीलाईट या चित्रपटातही त्यांनी एकत्र काम केले आहे. या दोघांची गणना बॉलिवूडच्या खास जोडप्यांमध्ये केली जाते.

हेही वाचा :

‘माझी चूक सिद्ध करून दाखवा, पद्मश्री पुरस्कार परत करेन’, ‘त्या’ वादग्रस्त विधानावर कंगना ठाम!

Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding | लग्नाच्या तयारीची सुरुवात, विकी-कतरिना चिडीचूप मात्र टीम राजस्थानला रवाना!


Published On - 9:10 am, Sun, 14 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI