AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sameer Wankhede: समीर वानखेडेंना मोठा झटका! आर्यन खानची वेबसीरिज अन् व्हायरल मीम्सवर कोर्ट नेमकं काय म्हणालं? वाचा

Sameer Wankhede: आर्यन खानची 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही वेब सीरिज सध्या चांगलीच चर्चेत आहे. या सीरिजविरोधात समीर वानखेडेंनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. आता हायकोर्टाने या प्रकरणावर नेमकं काय म्हटलं? वाचा...

Sameer Wankhede: समीर वानखेडेंना मोठा झटका! आर्यन खानची वेबसीरिज अन् व्हायरल मीम्सवर कोर्ट नेमकं काय म्हणालं? वाचा
Sameer Vankhede memeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 26, 2025 | 2:11 PM
Share

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा लेक आर्यन खानने बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या सीरिजच्या माध्यमातून पदार्पण केले आहे. आर्यनने या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजने पहिल्या दिवसापासून सर्वांचे लक्ष वेधले आहे. या सीरिजमधील काही दृश्यांवर सोशल मीडियावर तुफान मीम्स व्हायरल झाले. खरं तर सीरिजमध्ये समीर वानखेडेंसारखी एक भूमिका दाखवण्यात आली आहे. ती पाहून वानखेडेंनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. त्यांनी रेड चिली प्रोडक्शन हाऊसवर मानहानीचा दावा केला आहे. आता या प्रकरणावर कोर्टाने नेमकं काय म्हटलं आहे चला जाणून घेऊया…

नेमकं प्रकरण काय?

बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या सीरिजमध्ये समीर वानखेडेंसारखी हुबेहुब दिसणारा एक अभिनेता आहे. समीर वानखेडे यांनी कॉर्डेलिया क्रूझवरुन आर्यन खानला ड्रग्जप्रकरणात अटक केली होती. जवळपास महिनाभर आर्यन खान तुरुंगात होता. त्यानंतर त्याला क्लीन चिट देण्यात आली होती. आता ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’मध्ये दाखवलेली नक्कल पाहून समीर वानखेडेंनी थेट कोर्टात धाव घेतली होती. त्यांनी याचिकेत आरोप केला की एका विशिष्ट दृश्यातून त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. आता हाय कोर्टाने यावर दिलेल्या निर्णयाने समीर वानखेडेंच्या पदरी निराशा आली आहे.

वाचा: तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती तेपण नवरात्रीमध्ये; न्यूड फोटोशूटमुळे मराठमोळी अभिनेत्री झाली ट्रोल

आज झाला युक्तीवाद

शाहरुख खानच्या रेड चिलीस इंटरटेनमेंटर्फे ज्येष्ट वकील हरीश साळवे यांच्यावर युक्तीवादची जबाबदारी आहे तर नेटफ्लिक्सतर्फे ज्येष्ट वकील मुकुल रोहतगी यांना नेमण्यात आले आहे. तसेच समीर वानखेडे यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील संदीप सेठी यांनी युक्तिवाद केला. वानखेडे यांनी याचिकेत म्हटल्याप्रमाणे ही वेबसिरीज दिल्लीसह वेगवेगळ्या परिसरात प्रदर्शित होत असून सर्वाधिक मानहानी दिल्लीत झाल्याचा त्यांचा दावा आहे. दिल्लीत वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स व्हायरल झाल्याचे देखील याचिकेत म्हटले आहे.

काय म्हणाले हायकोर्ट?

कोर्टाने समीर वानखेडेंचा हा दावा फेटाळला आहे आणि योग्य ती दुरुस्ती याचिकेत करून या रजिस्ट्री तुम्हाला तारीख देईल. आम्ही निश्चित तारीख देणार नाही असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या सुनावणीची निश्चित तारीख देण्यास दिल्ली हायकोर्टाने नकार दिला असल्याचे समोर आले आहे.

‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या सीरिजविषयी

‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ ही वेब सीरिज 18 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजचे आठ भाग आहेत. या सीरिजच्या पहिल्याच भागात ड्रग्जविरोधात आवाज उठवणारा एक अधिकारी दाखवण्यात आला आहे. हा अधिकारी हुबेहुब समीर वानखेडे यांच्यासारखा दिसत आहे. हा अधिकारी बॉलिवूडच्या एका पार्टीवर छापा टाकतो. या सर्व गोष्टींचा उल्लेख समीर वानखेडे आणि त्यांनी आर्यनविरोधात केलेल्या कारवाईशी संबंधित असल्याचे म्हटले जात होते. त्यावरुन सर्वत्र मीम्स सुद्धा व्हायरल झाले होते. हे सर्व पाहून समीर वानखेडे यांनी हाय कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने सुनावणीची निश्चित तारीख देण्यास नकार दिला आहे.

Follow Us
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?.