AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समीर वानखेडेंनी पुन्हा का साधला आर्यन खानवर निशाणा, 4 मोठी कारणं अखेर समोर, 2 कोटींच्या मानहानीचा खटला

आर्यन खान याच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर समीर वानखेडेंनी साधला निशाणा..., 'ती' 4 कारणं जाणून व्हाल थक्क, तब्बल 2 कोटींच्या मानहानीचा खटला दाखल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आर्यन खान याची चर्चा...

समीर वानखेडेंनी पुन्हा का साधला आर्यन खानवर निशाणा, 4 मोठी कारणं अखेर समोर, 2 कोटींच्या मानहानीचा खटला
आर्यन खान
| Updated on: Sep 27, 2025 | 10:03 AM
Share

The Bads of Bollywood: बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याने ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ सीरिजमधून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर सीरिज प्रदर्शित झाली आणि लोकांनी आर्यनच्या कामाचं कौतुक केलं. पण आता लवकरच ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ वर स्थगिती येण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी आर्यन खानला ड्रग्जच्या आरोपाखाली अटक करणाऱ्या अधिकाऱ्याने सिनेमाविरुद्ध खटला दाखल केला आहे, त्यावर अनेक आरोप केले आहेत आणि सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ विरोधात याचिका दाखल

2021 मध्ये ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक करणारे एनसीबी मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आता चर्चेत आहेत. वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत त्यांनी ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या सीरिजवर कायमची बंदी घालण्याची मागणी केली. सीरिजमधील एका सीनमध्ये त्यांची खिल्ली उडवल्याचा दावा वानखेडे यांनी केला आहे.

समीर वानखेडे म्हणतात की, सीरिजमध्ये त्यांच्यासारखा दिसणारा एक पुरुष बॉलीवूड पार्टीत प्रवेश करतो आणि लोकांना विचारतो, ‘ड्रग्ज कोण घेत आहे?’ हे दृश्य प्रेक्षकांना स्पष्टपणे त्यांच्यावर टीका करताना दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समीर वानखेडे यांनी न्यायालयात चार महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत.

1. या शोमध्ये “सत्यमेव जयते” या राष्ट्रीय चिन्हाचा अपमान केला आहे. यात कोणीतरी बोटाने अश्लील हावभाव करताना दाखवले आहे. हे 1971 च्या राष्ट्रीय स्मारक संरक्षण कायद्याचे उल्लंघन करते.

2. समाजात ड्रग्जविरुद्ध लढा देत असतानाही, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि त्यांचे अधिकारी यांना या सीरिजमध्ये वाईट पद्धतीने दाखवले आहे.

3. ड्रग्ज प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालय आणि एनडीपीएस विशेष न्यायालयात प्रलंबित आहे. असे दृश्ये दाखवून न्यायालयीन प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.

4. या सीरिजमध्ये व्हेपिंग, धूम्रपान आणि मद्यपान यासारखे दृश्ये दाखवण्यात आली आहेत, ज्यावर NHRC ने आक्षेप घेतला आहे.

2 कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा

या कारणांमुळे, समीर वानखेडे यांनी शोच्या निर्मात्यांविरुद्ध 2 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. जर त्यांना ही रक्कम मिळाली तर ते ती टाटा कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटलला देतील असे त्यांनी म्हटले आहे. सांगायचं झालं तर, सीरिज शाहरुख खानची निर्मिती कंपनी, रेड चिलीज एंटरटेनमेंट द्वारे निर्मित केला आहे. यावर शाहरुख खान याने कोणतंच वक्तव्य केलं नाही.

Follow Us
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?.
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय.