AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“अशा पुरुषांना..”; पत्नीला तोकडे कपडे घालण्याची परवानगी देणाऱ्या पुरुषांवर भडकली सना

2020 मध्ये ग्लॅमर विश्व सोडत सना खानने अनस सय्यदशी निकाह केला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. यावेळी सनाने पत्नीला तोकडे कपडे घालण्याची परवानगी देणाऱ्या पतींवरही निशाणा साधला.

अशा पुरुषांना..; पत्नीला तोकडे कपडे घालण्याची परवानगी देणाऱ्या पुरुषांवर भडकली सना
अनस सय्यद- सना खानImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 24, 2024 | 10:38 AM
Share

अभिनेत्री सना खानने काही वर्षांपूर्वी इस्लाम धर्माचं कारण देत ग्लॅमर विश्वाला रामराम केला. त्यानंतर तिने मौलाना मुफ्ती अनस सय्यदशी निकाह करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सना तिच्या लग्नाविषयी, अभिनयक्षेत्र सोडण्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. अभिनेत्री रुबिना दिलैकच्या ‘किसीने बताया नहीं’ या पॉडकास्टमध्ये तिने हजेरी लावली होती. या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर बोलत असतानाच सनाने अशा पुरुषांवर निशाणा साधला जे त्यांच्या पत्नीला तोकडे कपडे घालण्याची परवानगी देतात. सनाच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.

ग्लॅमर विश्व सोडण्याआधी सनासुद्धा अनेकदा तोकड्या कपड्यांमध्ये वावरायची. सोशल मीडियावर ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करायची. मात्र कलाविश्व सोडण्याचा निर्णय घेतल्यापासून तिने तिच्या राहणीमानात खूप बदल केला. आता सना फक्त बुरखा किंवा अबायामध्येच दिसून येते. सना म्हणाली, “प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की त्याच्या पत्नीने शालीनता जपावी, हो ना? अनेकदा मी अशा पुरुषांना बघते तेव्हा मला अजब वाटतं की तुम्ही तुमच्या पत्नीला अशा तोकड्या कपड्यांमध्ये कसं काय बाहेर घेऊन जाता? आणि तुम्हाला त्या गोष्टीचा अभिमान वाटतो. माझी पत्नी हॉट दिसतेय, असं तुम्ही म्हणता. रस्त्यावरचा एखादा मुलगासुद्धा तुमच्या पत्नीला हॉट म्हणतोय, खासकरून तेव्हा जेव्हा ती तोकडे कपडे घालते. तुम्ही खरंच या गोष्टीचा अभिमान बाळगायला हवं का? तुमच्यात थोडातरी आत्मसन्मान असायला हवा.”

“तुम्हाला माहितीये की ती महिला आहे. 2019 मध्ये मला जाणवलं की मी या सर्व गोष्टींना मागे सोडणार आहे. त्यावेळी मी माझ्या आयुष्यात बऱ्याच वाईट गोष्टी करत होते. सोशल मीडियावर मी माझे बोल्ड फोटो पोस्ट करायचे. लोक मला सोशल मीडियावर जसं पाहतात, तशी मी खऱ्या आयुष्यात नाहीये, असं मला अनेकदा वाटायचं. मी ठराविक पद्धतीचे कपडे घालायची आणि डान्स करायची. मी तरुणांची दिशाभूल करतेय असं मला वाटायचं”, असंही ती पुढे म्हणाली.

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.