AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक रुपयाही देऊ नका; ऑपरेशन सिंदूरवर टीका करणाऱ्या अभिनेत्रीवर भडकले ‘सनम तेरी कसम’चे दिग्दर्शक

'सनम तेरी कसम' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेली पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेननं भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर टीका केली होती. त्यानंतर अभिनेता हर्षवर्धन राणेनं सीक्वेलमध्ये तिच्यासोबत काम करणार नसल्याचं जाहीर केलं.

एक रुपयाही देऊ नका; ऑपरेशन सिंदूरवर टीका करणाऱ्या अभिनेत्रीवर भडकले 'सनम तेरी कसम'चे दिग्दर्शक
हर्षवर्धन राणे, मावरा होकेनImage Credit source: Instagram
| Updated on: May 12, 2025 | 9:13 AM
Share

‘सनम तेरी कसम’ या लोकप्रिय चित्रपटाच्या सीक्वेलमधून पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेनला काढून टाकल्याची माहिती दिग्दर्शक राधिका राव आणि विनय सप्रू यांनी दिली. भारत-पाकिस्तानदरम्यान संघर्ष सुरू असताना मावराने जी टीका केली, त्यानंतर दिग्दर्शकांनी हा निर्णय घेतला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतरही भारतात काम केलेल्या पाकिस्तानी कलाकारांच्या मौनावर त्यांनी आश्चर्य आणि चिंता व्यक्त केली. 2016 मध्ये ‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेन यांच्या मुख्य भूमिका होत्या. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप झाला असला तरी प्रेक्षकांमध्ये तो प्रचंड लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वीच जेव्हा हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला, तेव्हा चांगली कमाई झाली होती.

पाकिस्तानी कलाकार आणि दहशतवादाबद्दल या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणाले, “कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा, मग ते कोणत्याही राष्ट्राविरुद्ध, राज्याविरुद्ध किंवा लोकांविरुद्ध असो नि:संशयपणे त्याचा निषेध केला पाहिजे. या प्रकरणात निराशाजनक गोष्ट म्हणजे भारतात काम करणाऱ्या आणि इथल्या प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम, आदर आणि संधी मिळवलेल्या काही पाकिस्तानी कलाकारांनी यावर मौन बाळगलंय. भारताविरुद्धच्या अशा दहशतवादी कृत्यांचा निषेध करण्यात ते अयशस्वी ठरले आहेत, हे त्याहूनही वाईट वाटतं. हद्द म्हणजे दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताने जी कारवाई केली, त्यावर काही जणांनी टीका केली. त्यामुळे आम्ही भारत सरकारच्या पाठिशी आहोत आणि त्यांच्या निर्णयाचं पूर्ण समर्थन करतो. राष्ट्र प्रथम आणि नेहमीच असेल. जय हिंद.”

“आम्ही पाकिस्तानी कलाकारांना एक रुपयाही देणार नाही. कोणत्याही भारतीय व्यासपीठाने त्यांच्याशी संबंध ठेवू नये. एक राष्ट्र म्हणून आपल्या वेळेतील एक मिनिटही आपण त्यांना देऊ नये. आपल्या राष्ट्राचं आणि आपल्या लोकांचं कल्याण हीच सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे”, असं त्यांनी स्पष्ट केलं.

याआधी हर्षवर्धन राणेनं ‘सनम तेरी कसम 2’मध्ये पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. ‘सध्याच्या घडामोडीदरम्यान थेट माझ्या देशाबद्दलचे कमेंट्स वाचल्यानंतर मी ‘सनम तेरी कसम 2′ या चित्रपटाचा भाग होण्यापासून आदरपूर्वक नकार देतो, जर त्यात पहिल्या भागातीलच कलाकार असतील तर मी त्यांच्यासोबत काम करणार नाही. माझ्या देशाबद्दल असं कोणी अपमानकारक वक्तव्य करत असेल तर ते माफ करण्यालायक नाही. मग माझे इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्स कमी झाले तरी चालतील, पण माझ्या अभिमानावर आणि संगोपनावर कोणालाच टीका करू देणार नाही. स्वत:च्या देशासोबत उभं राहणं चांगली गोष्ट आहे पण दुसऱ्या देशाबद्दल अनादरपूर्वक आणि द्वेषपूर्ण वक्तव्य करणं योग्य नाही’, असं त्याने लिहिलं होतं.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.