AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sania Mirza vs Shoaib Malik : शर्यतीत कोण पुढे? सानिया, शोएब यांच्याबद्दल मोठी गोष्ट समोर

Sania Mirza vs Shoaib Malik : घटस्फोटानंतर किती बदललं सानिया मिर्झा हिचं आयुष्य? शोएब मलिक याच्या आयुष्यात देखील झाले मोठं बदल... शर्यतीत कोण पुढे? दोघांच्या घटस्फोटानंतर चाहत्यांना देखील बसला मोठा फटका

Sania Mirza vs Shoaib Malik : शर्यतीत कोण पुढे? सानिया, शोएब यांच्याबद्दल मोठी गोष्ट समोर
| Updated on: Feb 16, 2024 | 10:48 AM
Share

Sania Mirza And Shoaib Malik Instagram Followers : भारतीय माजी टेनिसपटू सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू शोएब मलिक याला घटस्फोट दिल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये फक्त आणि फक्त सानिया हिची चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सानिया हिने बहिणीसोबत अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. तर शोएब याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत तिसऱ्या लग्नाचे फोटो पोस्ट केले. शोएब याच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

पण आता सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यामध्ये कोणाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. याशिवाय सोशल मीडियावर कोणाचा बोलबाला अधिक आहे? यावर चर्चा रंगली आहे. या शर्यतीत शोएब मलिक मागे राहिला आहे. सानिया हिने तिच्या सौंदर्याने आणि दमदार खेळामुळे चाहत्यांच्या मनावर राज्या केलं आहे. सानिया हिची प्रत्येक स्टाईल चाहत्यांना आवडते. तर जाणून इन्स्टाग्रामवर शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचे किती फॉलोअर्स आहेत.

सानिया हिने घटस्फोटानंतर इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले होते. जे चाहत्यांना प्रचंड आवडले. सानिया हिच्या पोस्टवर 4 दिवसांत 171,456 पेक्षा अधिक लाईक्स आहे. सानिया हिच्या फॅन फॉलोइंगबद्दल सांगायचं झालं तर, जगभरातून तब्बल 13 मिलियन नेटकरी फॉलो करतात. तर सानिया फक्त 666 नेटकऱ्यांना फॉलो करते. सानिया हिने इन्स्टाग्रामवर आतापर्यंत 1 हजार 708 पोस्ट शेअर केले आहेत.

शोएब मलिक तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत असला तरी, सोशल मीडियावर शोएब याता बोलबाला सानिया हिच्यासमोर काहीही नाही. शोएब याला इन्स्टाग्रामवर फक्त 2.4 मिलियन नेटकरी फॉलो करतात. तर शोएब 152 नेटकऱ्यांना फॉलो करतो. शोएब याने आतापर्यंत 1 हजार 093 पोस्ट शेअर केले आहेत.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, शोएब याच्या विवाबबाह्य संबंधांना कंटाळून सानिया हिने घटस्फोटाचा निर्णय घेतला. सानिया आणि शोएब यांना एक मुलगा देखील आहे. घटस्फोटानंतर सानिया ‘सिंगल मदर’ म्हणून लेकाचा सांभाळ करत आहे. सानिया कायम सोशल मीडियावर मुलासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सानिया हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.