AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सानिया मिर्झाची हजला जाण्यापूर्वी भावूक पोस्ट; म्हणाली, ‘कोणत्याही चुकीच्या आणि उणीवांसाठी…’

Sania Mirza | घटस्फोटानंतर सानिया मिर्झा निघाली हज यात्रेला, भावूक पोस्ट करत म्हणाली, 'कोणत्याही चुकीच्या आणि उणीवांसाठी...', सानिया कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. नुकताच, शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोट झाल्यामुळे सानिया चर्चेत...

सानिया मिर्झाची हजला जाण्यापूर्वी भावूक पोस्ट; म्हणाली, 'कोणत्याही चुकीच्या आणि उणीवांसाठी...'
| Updated on: Jun 12, 2024 | 1:43 PM
Share

मुस्लिम बांधवांसाठी हज यात्रा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. इस्लामच्या पाच स्तंभांपैकी हा एक स्तंभ आहे. हज यात्रा करणे हे प्रत्येक मुस्लिमांचे स्वप्न असते. प्रत्येक मुस्लिम आयुष्यात एकदा तरी हजची यात्रा करतो. आता भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा देखील हजच्या यात्रेला निघाली आहे. हज यात्रेला जाण्यापूर्वी सानिया हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत सानिया हिने कृतज्ञता व्यक्ती केली आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सानिया हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

सानिया म्हणाली, ‘अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हज येथे जाण्याची संधी मिळत आहे. मी या परिवर्तनीय अनुभवाची तयारी करत असताना, नम्रपणे कोणत्याही चुकीच्या आणि उणीवांसाठी तुमची क्षमा मागते. माझं मन कृतज्ञतेने भरलेलं आहे. अल्लाह माझ्या प्रार्थना स्वीकारेल… अशी आशा करते.

View this post on Instagram

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

सानिया पुढे म्हणाली, ‘मी खूप भाग्यवान आहे आणि मी खूप कृतज्ञ आहे. मी आता नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. त्यामुळे कृपया मला तुमच्या विचारांमध्ये आणि प्रार्थनेत ठेवा. मी नम्र अंतःकरणाने आणि मजबूत इमानाने एक चांगली व्यक्ती म्हणून परत येईल आशा करते…’ असं देखील सानिया म्हणाली.

खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे सानिया

सानिया मिर्झा हिने 2010 मध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्यासोबत लग्न केलं होतं. दोघांना एक पाच वर्षांचा मुलगा देखील आहे. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर शोएब याने तिसरं लग्न केलं आहे. तर सानिया मुलासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

सानिया हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं. सना हिच्यासोबत शोएब याचं तिसरं लग्न आहे. शोएब त्याच्या खासगी आयुष्यात पुढे गेला आहे. शोएब आणि सना यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा.
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य.
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष.
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?.
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ...
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ....