करिश्मा कपूरच्या एक्स पतीचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल; संजय जमिनीवर पडला होता अन्…शेवटच्या क्षणी अशी होती अवस्था
करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूरचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. दरम्यान संजयचा शेवटचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. ज्यात तो जमिनीवर पडलेला दिसत आहे. शेवटच्या क्षणी संजयची अशी झाली होती अवस्था.

करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूरचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. करिश्मा तिच्या मुलांसह दिल्लीला संजयच्या अंतिम संस्कारासाठी पोहचली होती. यावेळी सर्वजण खूप भावुक झालेले दिसले. दरम्यान संजयच्या मृत्यूच्या एक दिवस आधी त्याचे एक ट्वीट व्हायरल झाले होते तसाच आता त्याचा शेवटचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. जो संजयच्या शेवटच्या क्षणांचा असल्याचं म्हटलं जात आहे. व्हिडिओमध्ये संजय जमिनीवर पडलेला दिसत आहे.
व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?
व्हिडिओमध्ये संजय कपूर हा जमिनीवर पडलेला दिसत आहे. संजय भोवती वैद्यकीय पथक उभे आहे आणि ते त्याला सीपीआर देत असल्याचं दिसत आहे. 12 जून रोजी इंग्लंडमध्ये पोलो खेळत असताना चुकून मधमाशी गिळल्याने हृदयविकाराच्या झटका आल्यानं संजयचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
19 जून रोजी दिल्लीत संजयचे अंत्यसंस्कार
19 जून रोजी दिल्लीत संजयचे अंत्यसंस्कार झाले तेव्हा केवळ करिश्मा आणि तिची मुलेच नव्हे तर करीना कपूर खान आणि सैफ अली खान देखील तिथे उपस्थित होते. करिनाने तिच्या पुतण्या आणि भाचीलाही पूर्ण पाठिंबा दिला. संजयच्या अंत्यसंस्कारावेळी करिश्माला भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. तर तिचे मुलेही वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी खूप भावनिक झालेली दिसत होती.
View this post on Instagram
शेवटचे ट्विट
मृत्यूच्या काही दिवसापूर्वी संजयने एअर इंडियाच्या विमान अपघातावर ट्विट केले होते आणि लिहिले होते की, ‘या जगात तुमचा वेळ मर्यादित आहे. पुढे काय होईल याचा विचार करणे थांबवा, फक्त त्याबद्दल विचार करून आयुष्य पूर्ण जगा.’ पण संजय कपूरच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला.
2003 मध्ये करिश्मा कपूरशी दुसरे लग्न केले होते
संजयने 2003 मध्ये करिश्मा कपूरशी दुसरे लग्न केले होते. त्यांना समायरा आणि कियान ही दोन मुले आहेत. तथापि, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि 2014 मध्ये दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आणि 2016 मध्ये दोघेही वेगळे झाले. मात्र मुलांमुळे दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते.
