AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय कपूरच्या आईला लेकाच्या मृत्युपत्राबाबत शंका; प्रियाने बनावट मृत्युपत्र तयार केल्याचा आरोप, दिल्ली हायकोर्टात धाव

संजय कपूरच्या 30,000 कोटींच्या मालमत्तेवरून वाद वाढत चालला आहे. आता संजयची आई राणी कपूर यांनी देखील एका धक्कादायक माहितीसह दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी लेकाच्या मृत्युपत्राच्या सत्यतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच संजय आणि प्रिया सचदेवा यांच्यातील संबंध चांगले नव्हते असे त्यांचे म्हणणे आहे.

संजय कपूरच्या आईला लेकाच्या मृत्युपत्राबाबत शंका; प्रियाने बनावट मृत्युपत्र तयार केल्याचा आरोप, दिल्ली हायकोर्टात धाव
Sanjay Kapoor mother has doubts about her son willImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2025 | 6:16 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूरच्या निधनानंतर त्याच्या प्रॉपर्टीवरून काहीना काही वाद सुरु आहे. जरी संजय आणि करिश्मा एकमेकांसोबत राहत नव्हते तरी देखील मुलांमुळे दोघेही संपर्कात होते. पण आता संजयच्या मृत्यूनंतर त्याच्या 30,000 कोटींच्या प्रॉपर्टीबद्दल करिश्मा तसेच संजयची तिसरी पत्नी प्रिया सचदेवा यांच्यात वाद निर्माण झाला आहे.

लेकाच्या मृत्युपत्राच्या सत्यतेवरच प्रश्नचिन्ह

आता या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे. संजय कपूरची आई राणी कपूर यांनी देखील दिल्ली उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. राणी कपूर यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्र दाखल करत लेकाच्या मृत्युपत्राच्या सत्यतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “संजय कपूर आणि त्यांची तिसरी पत्नी प्रिया सचदेवा यांच्यातील संबंध देखील चांगले चालत नव्हते.”

संजय कपूरच्या आईने उपस्थित केले प्रश्नचिन्ह

याच कारणावरून राणी कपूर यांनी मृत्युपत्राच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ज्यामुळे हे प्रकरण आणखी वाढले आहे. करिश्मा कपूरच्या मुलांनीही त्यांच्या वडिलांच्या वैयक्तिक मालमत्तेवर हक्क सांगितला आहे आणि त्यांचा वाटा ते मागत आहेत, हा मुद्द्यावर सध्या उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

संजयच्या बहिणीचा प्रिया आणि संजयच्या नात्याबद्दलचा धक्कादायक खुलासा

एवढंच नाही तर संजयच्या बहिणीने देखील प्रिया आणि संजय यांच्या नात्याबद्दलचा धक्कादायक खुलासा केला आहे. संजय कपूरची बहीण मंदिराने संजयची तिसरी पत्नी प्रिया सचदेवावर आरोप केले आहेत. तसेच संजय आणि करिश्माचे लग्न मोडण्यासाठी तिला जबाबदार धरले आहे. तेव्हा देखील या प्रकरणाला आणखी एक नवीन वळण मिळाले.

एका मुलाखतीत तिने सांगितले की तिला संजयची प्रियाशी असलेली जवळीक आधीच माहित होती आणि तिने त्यांचे नाते कधीच मान्य केले नाही. मंदिराला त्यांना फ्लाईटमध्ये पाहिले होते जे की त्यांना आवडले नव्हते. त्यावेळी करिश्माने नुकतंट एका मुलाला जन्म दिला होता. हे प्रियाला माहित होते. तरी देखील तिने संजयसोबत जवळीक साधली. अशी कृत्य करणारी स्त्री पूर्णपणे चुकीची असल्याचं मंदिराचे मत होते. त्यामुळे संजयच्या आईने थेट कोर्टात प्रॉपर्टीबद्दल पुन्हा नव्या संशयाने निर्माण केल्याने या प्रकरणात काय नवीन ट्विस्ट पाहायला मिळेल हे पाहणे महत्त्वाचे आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.