Shah Rukh khan : शाहरुख खानच्या हेल्थबाबत मोठी हेल्थ अपडेट, जुही चावला म्हणाली…

शाहरुख खान याला डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने त्याला अहमदाबादमधील केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्या तब्येतीबद्दल त्याची मैत्रिण आणि अभिनेत्री जुही चावला हिने अपडेट्स दिले आहेत. आता शाहरुखची तब्येत कशी आहे ?

Shah Rukh khan : शाहरुख खानच्या हेल्थबाबत मोठी हेल्थ अपडेट, जुही चावला म्हणाली...
| Updated on: May 23, 2024 | 9:04 AM

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख याची तब्येत अचानक बिघडल्याने चाहते चिंतेत होते. अहमदाबादमध्ये आयपीएल मॅच पाहण्यासाठी गेलेल्या शाहरुखला अचानक त्रास होऊ लागल्याने त्याला अहमदाबादमधील केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले . ऊन लागल्याने, अर्थात उष्माघाताचा त्रास झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करून शाहरुखवर उपचार करण्यात आले. शाहरुखची पत्नी गौरी खान आणि त्याची मैत्रिण, अभिनेत्री जुहू चावला या दोघीही शाहरुखची भेट घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाल्या. आता शाहरुखच्या तब्येतीबाबत अपडेट्स समोर आले असून जुहीने यासंदर्भात माहिती दिली आहे.

कशी आहे शाहरुखची तब्येत ?

शाहरूखची तब्येत कशी आहे याबद्दल जुहीने अपडेट्स दिले. मंगळवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर KKR आणि SRH यांच्यात मॅच झाली. त्यावेळी शाहरुख खान हा त्याची मुलं सुहाना, अबराम आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी यांच्यासोबत मॅच पाहण्यासाठी उपस्थित होता. त्याचवेळी त्याचा उष्माघाताचा त्रास झाला. त्यानंतर त्याला तातडीने केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

जुही म्हणाली…

‘मंगळवारी रात्रीपासूनच त्याची तब्येत बरी नव्हती,मात्र त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आता त्याला आधीपेक्षा बरंच बरं वाटत आहे. देवाच्या कृपेने तो लवकर बरा होईल. आयपीएलच्या अंतिम सामन्यात तो स्टेडियममध्ये उपस्थित राहून त्याच्या संघाला सपोर्ट करेल असा विश्वासही जुहीने व्यक्त केला आगे. आम्ही अंतिम फेरीत पोहोचलो आहोत. केकेआर 10 वर्षांनंतर ट्रॉफी परत आणेल अशी मला आशा आहे, असेही जुही म्हणाली.

डिहायड्रेशनमुळे झाला त्रास

गेल्या दोन दिवसांपासून शाहरुख हा अहमदाबादमध्येच होता. प्रचंड ऊन असल्यामुळे त्याला डिहायड्रेशनचा त्रास झाला. केकेआरची मॅच संपल्यानंतर शाहरुख खान बराच वेळ मैदानात होता आणि चाहत्यांचे आभार मानत होता. त्यानंतर रात्री तो टीमसोबत अहमदाबादमधील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पोहोचला. जिथे, त्याचे टीमसोबत शानदार स्वागत करण्यात आलं.

मात्र 22 मेला सकाळी शाहरुखची तब्येत बिघडली. दुपारी एकच्या सुमारास त्याला केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. सध्या शाहरुख खानची तब्येत व्यवस्थित असल्याचं सांगितले जातंय. मात्र, शाहरुख हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याने त्याचे चाहते चिंतेत असून त्याला लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना सर्वजण करत आहेत.

2023 हे वर्षे शाहरुख खानसाठी खूप लकी ठरलं. गेल्यावर्षी प्रमाणेच त्याचे यावर्षी देखील अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी आले. त्याच्या चित्रपटांनी धमाकेदार कामगिरी केली.