‘एक छोटीशी गोष्टही तो….’ शाहरूख खानसोबत काम करण्याबद्दल अशोक सराफ काय म्हणाले?
बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी शाहरूख खानसोबत काम केलेलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी शाहरूखसोबत काम करण्याचा अनुभव आणि त्याची काम करण्याची पद्धत याबद्दल सांगितलं.

दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी फक्त मराठी चित्रपटांमध्येच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाच्या जोरावर एक खास ओळख बनवली आहे. बॉलिवूडमध्येही त्यांचं नाव हे फार आदराने घेतलं जातं. अशोक सराफ यांनी शाहरूख खानसोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी अझीझ मिर्झा यांचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘येस बॉस’ मध्ये शाहरूख खानसोबत काम करण्याचा अनुभव शेअर कले आहे. एवढंच नाही तर त्याचा स्वभाव देखील सांगितला आहे.
मुलाखतीत शाहरुख खानचा उल्लेख
या चित्रपटात शाहरुख खान, जॉनी लिव्हर, जुही चावला आणि अशोक सराफ यांच्यासह अनेक स्टार्स आहेत. शाहरुख खानने चार वर्षांनी मुंबईतील बांद्रा येथील त्याचे घर ‘मन्नत’ इमारतीसमोर शूटिंग केलं होतं. आता अलीकडेच अभिनेते अशोक सराफ यांनी एक मुलाखतीत त्यांनी अनेक स्टार्सबद्दल सांगितलं तसेत त्या कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभवही शेअर केला. यामध्ये शाहरुख खानच नाव त्यांनी खास करून घेतलं. त्यांनी ‘येस बॉस’च्या शुटींगदरम्यानचा शाहरुख खानचा एक किस्सा शेअर केला.
तो उगाच एवढा मोठा स्टार बनलेला नाही…
अशोक सराफ म्हणाले, “इंडस्ट्रीत त्याच्याइतका मेहनती दुसरा कोणी नाही. तो त्याच्या व्यक्तिरेखेसाठी खूप मेहनत घेतो. तो नेहमीच त्यात सुधारणा कशी करता येईल याचा विचार करण्यास तयार असतो. तो उगाच एवढा मोठा स्टार बनलेला नाही. त्याच्या अभिनयात त्याला मदत करणारी एक छोटीशी गोष्ट तो कधीही चुकवत नाही.” अशोक सराफ यांनी सांगितले की त्यांनी शाहरुख खानला वेगळ्या पद्धतीने एक सीन करण्याचा सल्ला दिला होता आणि त्याने त्यांची ती सूचना फार गांभीर्याने घेतली.
पण तो तसा नाही….
त्यांनी एक किस्सा सांगत म्हटलं की, “शाहरुख म्हणाला की चला रिहर्सल करूया आणि तो सीन परिपूर्ण होईपर्यंत त्याने अनेक वेळा रिहर्सल केली. सहसा कलाकार अशा कामांसांठी तयार नसतात. काही कलाकार एकच सीन पुन्हा पुन्हा करण्यास नकार देतात, पण तो तसा नाही. तो नेहमी प्रयत्न करतो आणि नंतर पाहतो की ती गोष्ट काम करतेय की नाही. तो खूप चांगला माणूस आहे.”
View this post on Instagram
शाहरुख खान कधीच थकत नाही….
अशोक सराफ पुढे म्हणाले, “जर कोणी मला विचारले की कोणाकडे सर्वात जास्त ऊर्जा आहे, तर मी शाहरुखचे नाव घेईन. त्याच्याकडे इतकी ऊर्जा आहे की तो कधी थांबतच नाही. तो कधीही थकत नाही. ही एक मोठी गोष्ट आहे, विशेषतः आजच्या काळासाठी. इतरांनी त्याच्याकडून हे शिकलं पाहिजे. म्हणूनच तो आज या पदावर पोहोचला आहे. मला तो खरंच खूप आवडतो, माझं फार प्रेम आहे त्याच्यावर”
