AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IIFA 2024: ‘ऊ अंटवा’ गाण्यावर थिरकले शाहरूख खान-विकी कौशल, भन्नाट डान्स पाहून…

पुष्पा चित्रपटातील 'ऊ अंटवा' हे गाणं भलतंच गाजलं. त्याची क्रेझ आजही कायम असून 'आयफा' पुरस्कार सोहळ्यातही ती दिसली. बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान आणि विकी कौशलही त्या गाण्यावर थिरकले.

IIFA 2024: 'ऊ अंटवा' गाण्यावर थिरकले शाहरूख खान-विकी कौशल, भन्नाट डान्स पाहून...
'ऊ अंटवा' गाण्यावर थिरकले शाहरूख-विकी कौशल
| Updated on: Sep 30, 2024 | 1:40 PM
Share

अबुधाबीमध्ये सध्या सेलिब्रिटींचा जल्लोष सुरु आहे. आयफा अवॉर्ड्स 2024 चा भव्य कार्यक्रम सुरू असून सर्वांच्या नजरा फक्त या मोठ्या कार्यक्रमाकडे लागल्या आहेत. यावर्षी बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान हा कार्यक्रम होसट करत असून, त्यामुळे सर्वच जण उत्साहित आहेत. रेड कार्पेटवरही मोठमोठे स्टार दिसले. त्यांचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सगळीकडे फक्त याच इव्हेंटची चर्चा सुरू आहे. हा कार्यक्रम होस्ट करणाऱ्या शाहरुखने यंग अभिनेता विकी कौशल सोबत केलेला डान्सही चर्चेचा विषय ठरला आहे . त्या दोघांच्या केमिस्ट्रीची सध्या खूप चर्चा सुरू आहे. सर्वांनीच शाहरुख-विकीच्या या परफॉर्मन्सला भरभरून दादही दिली.

‘ऊ अंटवा’ गाण्यावर थिरकले शाहरूख-विकी कौशल

पुष्पा 2 : द रूल या चित्रपटाची क्रेझ सध्या प्रचंड वाढली आहे. या चित्रपटाचा थ्रिलिंग टीझर आणि गाणी देखील रिलीज झाली असून सर्वांनाचा हा चित्रपट पाहण्याची खूप उत्सुकता लागली आहे. हा ‘पुष्पा’ या गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वेल असून सगळीकडे त्याचीच चर्चा आहे. आयफा अवॉर्डस 2024 मध्ये या चित्रपटाची बरीच क्रेझ होती. फक्त चाहतेच नव्हे तर सेलिब्रिटीही या पुष्पा  चित्रपटातील  गाण्याचे फॅन झाले असून बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि सध्याच्या जनरेशनमधील अव्वल अभिनेता विकी कौशलही या चित्रपटाचे फॅन आहेत.

View this post on Instagram

A post shared by IIFA Awards (@iifa)’

आयफाच्या स्टेजवर चक्क शाहरुख आणि विकी हे दोघे ‘पुष्पा’ चित्रपटातील गाजलेल्या ‘ऊ अंटवा’ या गाण्यावर थिरकले. त्या दोघांनी या गाण्यातील सिग्नेचर स्टेप केली. ‘ऊ अंटवा’ गाण्यात समंथा आणि अल्लू अर्जुन जसे नाचले, तशीच सेम टू सेम स्टेप शाहरुख-विकीने केली. त्यांचा हा परफॉर्मन्स पाहून उपस्थित सेलिब्रिटीही अवाक् झाले, त्यांचे चाहते बनले. दोघांच्याही या डान्सला सर्वांनी भरभरून दाद दिली. विशेष म्हणजे या चित्रपटातील गाण्याातील अभिनेत्री समंथा देखील या सोहळ्यासाठी उपस्थित होती. पुष्प 2 हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.

आयफा अवॉर्डसाठी ताऱ्यांची मंदियाळी

आयफा अवॉर्ड सोहळ्यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रेखा, अनन्या पांडे, विकी कौशल, क्रिती सेनन यांच्यासह अनेक स्टार्सनी उत्कृष्ट परफॉर्मन्स दिला. वयाच्या 69 व्या वर्षीही रेखाचे सौंदर्य आणि नृत्य पाहण्यासारखे आहे. सर्वत्र रेखा यांच्या डान्सची चर्चा रंगली. रेखा यांनी 90 च्या दशकातील गाण्यांवर डान्स केला. त्यांच्या परफॉर्मन्सलाही उपस्थितांची दाद मिळाली.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.