प्रियांका आणि निक जोनसचा हा बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर, परिणीतीला बसला धक्का

प्रियांका नुकतीच अमेरिकेत परतली आहे आणि परताच तिने जोनस ब्रदर्सच्या कॉन्सर्टलाही हजेरी लावली. मैफिलीतील प्रियांकाचे फोटोही चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. प्रियंका तिच्या पती आणि त्याच्या भावांच्या कामाला खूप पाठिंबा देते.

प्रियांका आणि निक जोनसचा हा बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर, परिणीतीला बसला धक्का
प्रियांका आणि निक जोनसचा हा बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर

मुंबई : प्रियांका चोप्रा(Priyanka Chopra) आणि निक जोनस(Nick Jonas) काही काळ आपापल्या व्यावसायिक जीवनात व्यस्त होते आणि आता शेवटी दोघांनाही एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे. या दरम्यान दोघांनी खूप मजा केली. दोघेही पूलमध्ये चिल करताना दिसले. प्रियांकाने एक फोटो शेअर केला आहे ज्यात निकने फोक आणि चाकू पकडला आहे आणि अभिनेत्री झोपली आहे. यावेळी प्रियांकाने बिकिनी घातली आहे. दोघांचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. (Share this bold photo of Priyanka and Nick Jonas on social media)

फोटो पाहून परिणीती चोप्राला बसला धक्का

परिणीती चोप्राला हा फोटो पाहून धक्काच बसला. तिने असेही म्हटले की कुटुंबही इन्स्टाग्रामवर आहे, तुम्ही कोणत्या प्रकारचे फोटो शेअर करत आहात. परिणीतीने कमेंट केली आहे की, ‘जीज, मिमी दीदी. हे सर्व काय चालले आहे? कुटुंबही इन्स्टाग्रामवर आहे. मी डोळे मिटून लाईक बटण दाबले आहे.’ प्रियांकाने स्वत:चा एक वेगळा फोटोही शेअर केला आहे ज्यात ती तिच्या फिट बॉडीची झलक दाखवत आहे. हा फोटो पाहून निकनेही अभिनेत्रीला आपले हृदय दिले आहे. त्याने या फोटोमध्ये हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.

प्रियंका नुकतीच अमेरिकेत परतली

प्रियांका नुकतीच अमेरिकेत परतली आहे आणि परताच तिने जोनस ब्रदर्सच्या कॉन्सर्टलाही हजेरी लावली. मैफिलीतील प्रियांकाचे फोटोही चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. प्रियंका तिच्या पती आणि त्याच्या भावांच्या कामाला खूप पाठिंबा देते. तिला वेळ मिळेल तेव्हा ती त्याच्या मैफिलीला नक्की जाते. याआधी प्रियांका लंडनमध्ये तिच्या आगामी सिटाडेल मालिकेचे शूटिंग करत होती. तिने आपले शूटिंगमधील फोटोही शेअर केले होते. शूटिंगदरम्यान प्रियांकाला दुखापतही झाली होती.

याशिवाय प्रियंकाने मॅट्रिक्सचे शूटिंगही पूर्ण केले आहे. प्रियांकाच्या बॉलिवूड प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर नुकतेच तिने जी ले जरा या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात प्रियांकासोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून तीन अभिनेत्री पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. (Share this bold photo of Priyanka and Nick Jonas on social media)

इतर बातम्या

Home Remedies : मुलायम आणि सुंदर हातांसाठी ‘हे’ घरगुती उपाय करा!

Gold Rate Today : सोने स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी, वाचा सोन्याचे ताजे दर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI