ही प्रसिद्ध अभिनेत्री नवरा झोपेतून उठायच्या आधी मेकअप करून झोपायची, कारण ऐकून बसेल धक्का
बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री नवरा झोपेतून उठण्याच्या आधी मेकअप करून पुन्हा झोपी जायची. कोण होती ती अभिनेत्री? नेमकं कारण काय?

Bollywood Actress : बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर आणि भारताचे माजी क्रिकेट कर्णधार मंसूर अली खान पटौदी यांची प्रेम कहाणी नेहमी चर्चेचा विषय बनली होती. 1968 मध्ये त्यांच्या लग्नामुळे चित्रपट आणि क्रिकेट एकत्र केले. दोघांची प्रेमकहाणी नेहमीच चाहत्यांमध्ये आकर्षणाचे केंद्र राहिली. दोघांमधील प्रेम, समजूतदारपणा आणि दोघांचे नाते हे कधीही तुटू दिले नाही.
दरम्यान, यानंतर दोघांना तीन मुले झाली. ज्यामध्ये सबा अली खान, सैफ अली खान आणि सोहा अली खान. ही तिन्ही मुले त्यांच्या नात्यामधील सुंदर बंधनाचे उदाहरण देतात.
शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान या दोघांमधील नाते हे फक्त प्रेमाचे नव्हते ते तर विश्वास, आदर, समर्पण, त्याग आणि सहवासाचे होते. त्यामुळे न बोलता एकमेकांच्या भावना समजून घेणं हे देखील त्या नात्यामधील पिढ्यानुपिढ्या एकत्र ठेवतात. शर्मिला आणि मन्सूर हे दोघेही त्यांच्या क्षेत्रात मास्टर होते.
त्यांनी कधीही अहंकाराला त्यांच्या नात्यात आणले नाही. अशातच त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांची मुलगी आणि अभिनेत्री सोहा अली खानने एक मनोरंजक गोष्ट उघड केली.
शर्मिला टागोर मेकअप लावून झोपायच्या
सोहा अली खानने एका पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत तिच्या आईच्या वैवाहिक आयुष्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. सोनाक्षी सिन्हासोबतच्या तिच्या नात्याबद्दल चर्चा करत असताना तिने हा खुलासा केला आहे.
सोहाने सांगितले की, लग्नानंतर तिची आई म्हणजेच शर्मिला या सकाळी मन्सूर अली खान हे झोपेतून उठायच्या आधी थोडा मेकअप करून नंतर पुन्हा झोपी जायची. कारण जेणेकरून ती सकाळी उठल्यावर तिची पहिली नजर शर्मिला टागोर यांच्यावर पडायची. जी ती पडद्यावर बघायची.
सोहा पुढे म्हणाली की, मला मेकअपशिवाय कुणालसमोर खूप आरामदायी वाटते. पण माझी आई मला सांगायची की ती लग्नानंतर लवकर उठून थोडा मेकअप करून पुन्हा झोपी जायची कारण बाबा म्हणायचे की त्यांना सकाळी उठल्यानंतर मला बघायला आवडायचे.
शर्मिला यांनी लन्नासाठी ठेवलेली अट
तुम्हाला सांगायचं झालं तर शर्मिला टागोर आणि मंसूर अली खान पटौदी यांची प्रेम कहाणी एखाद्या चित्रपटासारखी होती. यामध्ये मंसूर यांनी शर्मिला यांना लग्नाची मागणी केली होती. तेव्हा शर्मिला यांनी एक अट ठेवली होती. ज्यामध्ये क्रिकेटच्या सामन्यात तीन षटकार मारले तर लग्नासाठी शर्मिला यांचा होकार असेल.
